मला घटस्फोट दे, अरमान मलिकची पहिली पत्नी वैतागली, थेट म्हणाली, मला घरातूनही..
अरमान मलिक हे सध्या जोरदार चर्चेत असलेले एक नाव आहे. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. हेच नाबी तर अरमान मलिक हा दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला आहे.
अरमान मलिक हा त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात सहभागी झालाय. अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे. अरमान मलिक याने पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेताच कृतिका हिच्यासोबत लग्न केले. आता तिघेही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अरमान मलिक हा 200 कोटी संपत्तीचा मालक आहे. दोन लग्न केल्याने सतत अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका केली जाते. हेच नाही तर अरमान मलिकने पत्नीच्या मैत्रिणींसोबतच हे लग्न केले आहे.
कृतिका मलिक हिने नुकताच बिग बॉसच्या घरात असताना थेट म्हटले की, मी लोकांचा पती वापरत आहे तर टॉवेल काय मोठी गोष्ट आहे. कृतिका मलिकचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले. यानंतर कृतिकाही हसताना दिसतंय. कृतिका आणि पायल खूप जास्त चांगल्या मैत्रिणी आहेत. पायल हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिकाला एक मुलगा आहे.
पायल ही अरमान मलिक आणि कृतिका यांना चांगलीच वैतागल्याचे बघायला मिळतंय. पायल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. या व्हिडीओमध्ये पायल ही अरमान मलिक याला घटस्फोटाबद्दल बोलताना दिसत आहे. पायल हिचा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे, ज्यावेळी ती अरमान याच्यासोबत दुबईला गेली होती.
व्हिडीओमध्ये अरमान मलिक हा पायल हिला म्हणतो की, तू मला त्रास देतंय. अरमानचे हे बोलणे ऐकून पायल थेट म्हणते की, घटस्फोट दे मग मला. यावर अरमान मलिक हा म्हणतो की, मी तुला घटस्फोट देऊ शकत नाही, कारण तू मला घरातूनही बाहेर काढू शकते. यावर पायल म्हणते सर्वांनी पाहा मी पूर्ण संधी अरमानला दिली.
अरमान मलिक हा म्हणतो की, तु मला घराच्या बाहेर यासाठी काढू शकते की, सर्वकाही तुझ्याच नावावर आहे. आता अरमान मलिक आणि पायल यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मात्र, या व्हिडीओ बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होण्याच्या अगोदरचा आहे. अनेक लोक हे अरमानसोबतच पायल आणि कृतिका यांच्यावरही टीका करताना दिसत आहेत.