विशाल पांडे याच्यामुळे अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीने घेतला मोठा निर्णय, कृतिका ही…
Bigg Boss ott 3 : बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच चर्चेत आल्याचे देखील बघायला मिळतंय. विशाल पांडे याच्या कानाखाली काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याने लगावली. त्यानंतर बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा झाला.
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा हंगामा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे बिग बॉसचे हे सीजन सुरूवातीपासूनच चर्चेत आले. हे सीजन हिट होताना देखील दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला. मात्र, पायल मलिक ही बिग बॉसमधून बाहेर झालीये. अरमान मलिक याने रागाच्या भरात थेट विशाल पांडे याच्या कानाखाली मारली. विशाल पांडे याने अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिच्याबद्दल कटारिया याच्या कानात म्हटले होते की, ‘भाभी मुझे अच्छी लगती है’ यानंतरच घरात मोठा हंगामा बघायला मिळाला.
पायल मलिक हिने बिग बॉसच्या मंचावर येत विशाल पांडे याची पोलखोल केली. आता नुकताच कृतिका मलिक आणि चंद्रिका दीक्षित यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. चंद्रिका दीक्षित हिला बोलताना कृतिका मलिक ही म्हणाली की, मला आता डीप गळ्यांचे कपडे घालूच वाटत नाहीयेत. मी या घरात इथे तसे कपडे घालणार नाहीये, माझे मनच होत नाहीये.
बरेच कपडे मी वरती ठेऊन देखील दिले. मुळात म्हणजे कृतिका मलिक आणि विशाल हे दोघे चांगलेच मित्र होते. अनेकदा बिग बॉसच्या घरात ते एकत्र बसून गप्पा मारायचे. मात्र, कृतिका मलिक हिच्याबद्दल विशाल पांडे याने केलेल्या विधानानंतर ती खूप जास्त नाराज झाल्याचे बघायला मिळतयं.
हेच नाहीतर विशाल पांडे याने कृतिका मलिकबद्दल केलेल्या विधानानंतर घरातील सदस्य देखील विशाल पांडे याच्यासोबत फार काही बोलत नसल्याचे देखील दिसत आहे. आता अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्या वादानंतर घरात काही ग्रुपही बघायला मिळत आहेत. शिवानी ही विशालला बोलत असल्याचे पाहून चंद्रिका देखील तिला समजावताना दिसली.
कृतिका मलिक ही अरमान मलिक याची दुसरी पत्नी आहे. कृतिका मलिक हिच्यासोबत अरमान मलिक याने लग्न करण्याच्या अगोदरच त्याचे पायल हिच्यासोबत लग्न झाले होते. विशेष म्हणजे कृतिका ही पायलची मैत्रिण होती आणि पायलला घटस्फोट न देताच अरमान मलिक याने कृतिका मलिक हिच्यासोबत लग्न केले होते. आता मलिक कुटुंबिय व्लॉगच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्याबद्दलचे अपडेट शेअर करताना दिसतात.