Uddhav Thackeray: ‘कर्म! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकारसोबत झालं’; आरोह वेलणकरचा शरद पवारांना टोला
गेले काही दिवस महाराष्ट्राचं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. यासंदर्भात आरोह ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाला. 'महाराष्ट्राच्या जनतेचा आज विजय झाला', असं त्याने एका ट्विटमध्ये म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विटमधून त्याने शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फ्लोअर टेस्टला सामोरं जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळलं. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील फ्लोअर टेस्ट टळली. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी दावा केला जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यातच अभिनेता आरोह वेलणकरचे (Aroh Welankar) काही ट्विट्स चर्चेत आले आहेत. गेले काही दिवस महाराष्ट्राचं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. यासंदर्भात आरोह ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाला. ‘महाराष्ट्राच्या जनतेचा आज विजय झाला’, असं त्याने एका ट्विटमध्ये म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विटमधून त्याने शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आहे. ‘कर्म, जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकारसोबत झालं’, असं लिहित त्याने एका जुन्या बातमीचा फोटो पोस्ट केला आहे.
महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. शरद पवार यांनी 1978 मध्ये महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाचं काँग्रेसचं सरकार पाडलं होतं. त्यांनी काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं आणि त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झाले होते. शरद पवार यांनी बंड करून काँग्रेसच्या 38 आमदारांसह वेगळा गट स्थापन करून सरकार स्थापन केलं होतं. याच बातमीचा फोटो पोस्ट करत आरोहने शरद पवारांना टोला लगावला आहे. जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकारसोबत झालं, अशा शब्दांत त्याने टोमणा मारला आहे.
आरोह वेलणकरचं ट्विट 1-
People of #Maharashtra have won! ??
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 29, 2022
आरोह वेलणकरचं ट्विट 2-
Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…?? pic.twitter.com/qsDUdCNtOn
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 29, 2022
शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोड्याच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली.