Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshad Warsi | ‘खात्री होती ती मला उद्ध्वस्त करेल…’, ‘मुन्नाभाई MBBS’ फेम सर्किटच्या आयुष्यातील मोठी चूक

'त्या एका होकारानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल याची खात्री होती...', अभिनेता अर्शद वारसी याने अनेक वर्षांनंतर सांगितली तरुणपणी केलेली मोठी चूक

Arshad Warsi | 'खात्री होती ती मला उद्ध्वस्त करेल...', ‘मुन्नाभाई MBBS’ फेम सर्किटच्या आयुष्यातील मोठी चूक
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 9:51 AM

मुंबई : ‘मुन्नाभाई MBBS’ फेम अभिनेता अर्शद वारसी याने सिनेमांमध्ये काम केलं. डान्सर म्हणून करियरची सुरुवात केलेल्या अर्शद वारसी याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आजही अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमातील सर्किट म्हणून अर्शद प्रसिद्ध आहे. ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमात सर्किटची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्याने खंत व्यक्त केली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अर्शदने ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमातील सर्किटबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा सुरु आहे. ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमा माझ्यासाठी मृत्यूची घंटा आहे हे माहिती असताना देखील मी भूमीका साकारली…

अर्शद ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमातील स्वतःच्या भूमिकेबद्दल म्हणाला, ‘सर्किटच्या भूमिकेसाठी अभिनेते मकरं देशपांडे यांनी देखील नकार दिला होता. मी सिनेमा फक्त दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासाठी केला. मला खात्री होती सिनेमात काम केल्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल.. मुन्नाभाई माझा शेवटचा सिनेमा असेल असं मला वाटत होतं. मी जी भूमिका साकारणार होती, ती एका गुंडची भूमिका होती…’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही एखादी भूमिका साकारण्यासाठी होकार देता तेव्हा तुम्ही फक्त कागदावर लिहिलेल्या गोष्टी पाहता… सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मला कळालं आणि त्याचे परिणाम मी पाहिले. सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, पण मला काहीही मिळालं नाही… ‘ असं देखील अभिनेता म्हणाला… (Arshad Warsi to destroy career)

‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमामुळे अभिनेता संजय दत्त याच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. पण सर्किटची भूमिका साकारल्यानंतर काहीही मिळालं नाही अशी खंत्र अर्शद वारसी याने अनेक वर्षांनंतर केली. सध्या सर्वत्र अर्शद वारसी आणि अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे…

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातील काही सीन आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर अर्शद वारसी याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अभिनेता कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

अर्शद वारसी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘असुर 2’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर सीरिजच्या दुसऱ्या भागाची चर्चा देखील तुफान रंगत आहे. अर्शद कायम त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी अभिनेत्याने अनेक गोष्टींचा सामना केला.

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.