‘सर्किट’च्या अजब प्रेमाची गजब कहाणी; तरुणीच्या कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळली बियर अन्..
Arshad Warsi Love story : अभिनेता अर्शद वारसी (arshad warsi) याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण अभिनेत्याला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. सिनेमातील अभिनेत्याच्या सर्किट या भूमिकेने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. अर्शद कायम त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. पण अभिनेत्याच्या भूमिकांप्रमाणेच त्याची लव्हस्टोरी देखील तुफान चर्चेत आली. पण बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी आणि प्रेम मिळवण्याआधी अभिनेत्याला अनेक गोष्टींचा […]
Arshad Warsi Love story : अभिनेता अर्शद वारसी (arshad warsi) याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण अभिनेत्याला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. सिनेमातील अभिनेत्याच्या सर्किट या भूमिकेने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. अर्शद कायम त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. पण अभिनेत्याच्या भूमिकांप्रमाणेच त्याची लव्हस्टोरी देखील तुफान चर्चेत आली. पण बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी आणि प्रेम मिळवण्याआधी अभिनेत्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एक काळ असा होता जेव्हा अर्शद कॉस्मेटिक विकण्याचं काम देखील करायचा शिवाय त्याने एका फोटो लॅबमध्ये देखील काम केलं आहे. (arshad warsi love story)
आयुष्यात येणाऱ्या चढ – उतारांचा सामना करत असताना अर्शद वार्सीच्या आई – वडिलांचं निधन झालं. अभिनत्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्यानंतर अर्शद एक डान्स गृपमध्ये सहभागी झाला. अनेक कार्यक्रम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये अभिनेत्याला संधी मिळाली. त्यानंतर अर्शद याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. (arshad warsi old movies)
करियरच्या उच्च शिखरावर चढत असताना अभिनेत्याला कॉलेजमध्ये एका डान्स शोचा परीक्षक म्हणून बोलावण्यात आलं. तेव्हा अर्शद याला मारिया नावाच्या मुलीचा डान्स आवडला. याच डान्स शोमध्ये अर्शदला त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती भेटली. अर्शदला मारिया हिचा डान्स इतका आवडला की, अभिनेत्याने मारिया हिला आपल्या डान्स ग्रुपमध्या सामिल होण्याची ऑफर दिली.
पण अर्शद याने दिलेली ऑफर मारिया हिने नाकारली. त्यानंतर पुन्हा दोघांची भेट एका ओळखीच्या व्यक्तीमुळे झाली. तेव्हा मारियाने अर्शदच्या डान्स ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात देखील झालं पण दोघेही त्यांच्या मनातील भावना एकमेकांना सांगत नव्हते. (Arshad Warsi Love story)
शेवटी अर्शद याने त्याच्या मनातील भावना मारिया हिला सांगितल्या. पण अर्शदच्या प्रेमाला मारियाने नकार दिला. पण जेव्हा अर्शद आणि मारिया दोघे दुबईला फिरायला गेले तेव्हा अभिनेत्याने शक्कल लढवून मारियाकडून प्रेम कबूल करुन घेतलं. (bollywood love couple)
दुबईत अर्शद याने मारियाच्या कोल्ड ड्रिंकमध्ये बियर मिक्स केली. ती कोल्ड ड्रींक प्यायल्यानंतर मारिया ही फार नशेत होती. तेव्हा अर्शदने मारिया हिच्यकडून प्रेम कबूल करुन घेतलं. प्रेमाची कबुली दिल्यानंतर दोघांनी 1999 मध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन पद्धातीत लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला जवळपास २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. (affairs relationships)