अंबानींच्या कार्यक्रमातील ‘त्या’ फोटोवर भडकली ‘सर्किट’ची पत्नी

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनला हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक छोटे-मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातीलच एका फोटोवर अर्शद वारसीच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली.

अंबानींच्या कार्यक्रमातील 'त्या' फोटोवर भडकली 'सर्किट'ची पत्नी
अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमधील 'त्या' फोटोवर भडकली 'सर्किट'ची पत्नी Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 8:48 AM

मुंबई : 6 मार्च 2024 | गेल्या चार-पाच दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचीच चर्चा आहे. सोशल मीडिया अकाऊंट उघडताच थेट जामनगरला पोहोचल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली. गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस हा भव्यदिव्य प्री-वेडिंग कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी परदेशातूनही मोठमोठ्या सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं होतं. या शाही कार्यक्रमाची सजावट अक्षरश: डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. सोशल मीडियावर कार्यक्रमाचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतानाच त्यातील एका फोटोवर अभिनेता अर्शद वारसीची पत्नी नाराज झाली आहे. अर्शदची पत्नी मारिया गोरेट्टीने तो फोटो शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मारियाने जो फोटो शेअर केला आहे, त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रंप फोटोसाठी पोझ देताना दिसून येतेय. तिच्या मागे एक हत्ती उभा असल्याचं पहायला मिळतंय. अंबानींच्या कार्यक्रमात हत्तीला ‘प्रॉप’ म्हणून वापरल्याप्रकरणी अर्शद वारसीच्या पत्नीने दु:ख व्यक्त केलंय. मुक्या प्राण्यांप्रती निर्दयी वागणूक दिल्याने मारियाने अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमावर टीका केली आहे. सजवलेल्या हत्तीच्या पुढे उभ्या असलेल्या इव्हांका ट्रम्पच्या या फोटोला तिने भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

तिने पुढे लिहिलं, ‘मी अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमातील हा फोटो पाहून हैराण झाले आहे. असं कोणत्याही प्राण्यासोबत होऊ नये. विशेषकरून त्या प्राण्यांसोबत तर होऊ नये ज्यांना वाचवलं गेलंय आणि ज्यांचं पुनर्वसन केलं गेलंय. हे अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारं चित्र आहे. एका हत्तीला इतक्या लोकांच्या आणि इतक्या आवाजात एका प्रॉपसारखं उभं केलं गेलंय.’

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये बरेच थीम होते. त्यापैकीच एक थीम अंबानींच्या ‘ॲनिमल रेक्स्यू सेंटर वनतारा’वर आधारित आहे. या प्री-वेडिंग कार्यक्रमाला बच्चन कुटुंबीयांसह शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करीना कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह यांसह संपूर्ण बॉलिवूडच अवतरलं होतं. आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप सिंगर रिहानासुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.