‘आर्टिकल 370’मधील मोदी, अमित शाह यांच्या भूमिका पाहून नेटकरी थक्क; कलाकारांना ओळखलंत का?

'आर्टिकल 370' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील भूमिका पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिका प्रसिद्ध कलाकारांनी साकारल्या आहेत. या भूमिकांवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय.

'आर्टिकल 370'मधील मोदी, अमित शाह यांच्या भूमिका पाहून नेटकरी थक्क; कलाकारांना ओळखलंत का?
आर्टिकल 370Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 8:32 AM

मुंबई : 9 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री यामी गौतमच्या आगामी ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील काही भूमिका पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. एकीकडे यामीने इंटेलिजन्स ऑफिसर जूनी हक्सरची भूमिका साकारली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत चक्क रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आहेत. अरुण गोविल यांना मोदींच्या लूकमध्ये पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. याशिवाय चित्रपटात गृहमंत्री अमित शाह यांची भूमिकासुद्धा एका नामांकित अभिनेत्याने साकारली आहे. या अभिनेत्याविषयी नेटकरी गुगलवर सर्च करू लागले आहेत.

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवण्यात आल्या होत्या. आता ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात कलम 370 हटवण्यावरून झालेला गदारोळ दर्शविण्यात येणार आहे. 2 मिनिटं 40 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये यामीच्या भूमिकेला काश्मीरमध्ये ‘हरवलेलं प्रकरण’ असं म्हटलंय. एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत ती दिसून येत आहे. तर किरण यांना नेत्यांमध्ये भाषण देताना पाहून नेटकरी दंग झाले आहेत. ट्रेलरमध्ये अरुण गोविल यांना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. प्रभू श्रीराम या नेहमीच्या भूमिकेपेक्षा काहीतरी वेगळं केल्याचं समाधान नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. ‘रामायण’ या मालिकेनंतर त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली आहे. खऱ्या आयुष्यातही त्यांना अनेकजण ‘राम’ म्हणूनच संबोधतात. तर काही चाहते त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वादसुद्धा घेतात.

हे सुद्धा वाचा

‘आर्टिकल 370’ या चित्रपटात गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका अभिनेते किरण करमरकर साकारत आहेत. किरण करमरकर हे ‘बिग बॉस 17’मध्ये सदस्य म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री रिंकू धवनचे पूर्व पती आहेत. या दोघांनी 2002 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगा असून तो रिंकूसोबत राहतो. ‘आर्टिकल 370’मध्ये अरुण गोविल आणि किरण करमरकर यांच्याशिवाय प्रियामणी, वैभव तत्त्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, दिव्या सेठ शाह, राज जुत्थी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षे मायादेव यांच्याही भूमिका आहेत. अभिनेत्री यामी गौतमचा पती आदित्य धर आणि मोनाल ठाकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.