Dadasaheb Phalke Award | पुरस्कार विजेत्यांना मिळतात ‘या’ मैल्यवान गोष्टी; नक्की जाणून घ्या

Dadasaheb Phalke Award | दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारासोबतच मिळतात 'या' मैल्यवान गोष्टी... सध्या सर्वत्र दादासाहेब फाळके पुरस्काराची चर्चा... यंदाच्या वर्षीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर...

Dadasaheb Phalke Award | पुरस्कार विजेत्यांना  मिळतात 'या' मैल्यवान गोष्टी; नक्की जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 11:17 AM

मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलाकारांना देण्यात येतो. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना दादासाहेब फाळके पुरस्कार देवून त्यांत्या कामाचं कौतुक करण्यात आलं.. यंदाच्या वर्षीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. वहिदा रहमान यांनी ६० – ७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वाहिदा रहमान यांची चर्चा रंगत आहे.

अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यामुळे आणि सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा केल्यानंतर अनेक जण वहिदा रहमान यांना शुभेच्छा देत आहेत. तर वहिदा यांनी देखील चाहते, मित्र आणि कुटुंबियांचे आभार मानले आहेत.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सिनेविश्वात मोलाचं योगदान असलेल्या कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानिक करण्यात येत. पुरस्काराची घोषणा वर्षातून एकदा होते. पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारासोबतच अन्य मैल्यवान गोष्टी मिळतात…

पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारासोबतच सुवर्ण कमळ, एक शॉल आणि १० लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येते. पण १९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार पहिल्यांदा १९६९ साली देविका राणी यांना प्रदान करण्यात आला होता.

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहिदा रहमान यांची प्रतिक्रिया

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वाहिदा रहमान म्हणाल्या, ‘भारत सरकारने या सन्मानासाठी माझी निवड केली म्हणून मी आनंदी आहे. पण माझे आवडते सहकलाकार दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या १०० व्या वाढदिवसाच्या दिवशी पुरस्करा जाहीर झाल्यामुळे मी आनंदी आहे.. यापेक्षा चांगला दुसरा दिवस असू शकत नाही…’

पुढे वाहिदा रहमान म्हणाल्या, ‘मी माझ्या चाहत्यांचे आभार मानते.. ज्यांनी पूर्ण करियरमध्ये माझ्यावर प्रेम केलं. आज देखील चाहते माझा आदर करतात…’ एवढंच नाही तर, वाहिदा रहमान यांनी देव, चाहते, मित्र आणि कुटुंब सर्वांचे आभार मानले… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वाहिदा रहमान यांची चर्चा रंगत आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.