Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naatu Naatu गाण्यावर केजरीवाल यांचा भन्नाट डान्स; गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर AAP कडून व्हिडीओ पोस्ट

आम आदमी पार्टीच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओत चक्क दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान 'नाटू नाटू' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

Naatu Naatu गाण्यावर केजरीवाल यांचा भन्नाट डान्स; गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर AAP कडून व्हिडीओ पोस्ट
Naatu Naatu गाण्यावर केजरीवाल यांचा भन्नाट डान्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 12:06 PM

नवी दिल्ली: एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या कॅटेगरीमध्ये या गाण्याने बाजी मारली. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कारण गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा RRR हा आशियातील पहिला चित्रपट ठरला आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच आम आदमी पार्टीच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओत चक्क दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

आम आदमी पार्टीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर RRR चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देणारी ही पोस्ट आहे. यामध्ये पहिला फोटो हा संगीतकार किरवाणी यांचा ट्रॉफीसोबतचा आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये नाटू नाटू गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ पहायला मिळत आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्याचा आनंद साजरा करत केजरीवाल आणि भगवंत मान नाटू नाटू गाण्यावर नाचताना दिसत आहेत. केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या चेहऱ्याचा फोटो वापरत हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. आतापर्यंत त्याला 60 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. ‘नेक्स्ट लेव्हल सेलिब्रेशन’ असं एका युजरने म्हटलंय. तर ‘एडिटिंग आवडलंय’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

‘नाटू नाटू’ या गाण्यावरील डान्सची कोरिओग्राफी प्रेम रक्षितने केली आहे. या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्याने रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी 110 स्टेप्स तयार केले होते. या संपूर्ण प्रवासात राजामौली यांनी खूप साथ दिल्याचं त्याने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.