Aryan Khan आणि अनन्या पांडे यांचा ‘हा’ व्हिडीओ पाहून चाहते हैराण; पहिल्यांदा दिसला किंग खानच्या लेकाचा असा अंदाज
कायम रागात दिसणाऱ्या किंग खानच्या लेकाचा असा अंदाज पाहून चाहते हैराण; आर्यन खान आणि अनन्या पांडे हिला एकत्र पाहिल्यानंतर चाहते थक्क... पाहा व्हिडीओ

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असतात. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान अनेकदा अनन्या पांडेकडे दुर्लक्ष करताना दिसतो. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र होते, पण समोर एकमेकांना पाहिल्यानंतर देखील आर्यन आणि अनन्याने दुर्लक्ष केलं. अनन्या आणि शाहरुख खान याची लेक सुहाना खान चांगल्या मैत्रीणी असल्यामुळे अनन्याचं खान कुटुंबासोबत जवळचं नातं आहे. सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर या चांगल्या मैत्रीणी आहेत. लहानपणापासून तिघीही एकत्र आहेत. त्यामुळे आर्यन खान याच्यासोबत देखील अनन्या आणि शनाया यांची चांगली ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अनन्या आणि आर्यन यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असावं अशी चर्चा रंगत होती.
दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असावं अशी चर्चा जोर धरत असताना अनन्या आणि आर्यन यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे गप्पा मारताना दिसत आहे. दोघांना पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. व्हिडीओ एखाद्या सामन्या दरम्यानचा असल्याची चर्चा रंगत आहे. व्हिडीओमध्ये दोघे शेजारी बसले आहेत आणि कोणत्यातरी मुद्द्यावर बोलताना दिसत आहे.




View this post on Instagram
कायम रागात दिसणाऱ्या किंग खानच्या लेकाचा असा अंदाज पाहून चाहते हैराण झाले आहेत. सांगायचं झालं तर, ड्रग्स केममध्ये नाव आल्यानंतर आर्यन आणि अनन्या यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. सध्या सर्वत्र अनन्या आणि आर्यन यांच्या व्हिडीची चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे, दोघांच्या व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अनन्याला आर्यनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. करण याने विचारलं , ‘तुम्ही एकत्र मोठे झालात, कधी आर्यन याच्यावर क्रश आलं नाही…’ यावर अनन्या म्हणाली, ‘आर्यन क्यूट आहे. माझं त्याच्यावर क्रश आलं होतं.’ पुढे करण म्हणाला, ‘अस असताना पुढे काही झालं नाही…’. अनन्या म्हणाली, ‘आर्यनला विचार…’ सध्या सर्वत्र आर्यन आणि अनन्या यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.
अनन्या पांडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर अनन्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम सक्रिय असतात. सध्या अभिनेत्रीचं नाव अभिनेता अदित्य राय कपूर याच्यासोबत जोडण्यात येत आहे. पण नात्याबद्दल दोघांनी मौन बाळगलं आहे.