Aryan Khan: शाहरुख खानचा मुलगा आर्यनची मोठी घोषणा; बॉलिवूडच्या पहिल्या प्रोजेक्टची दाखवली झलक

Confirm! आर्यन खानची बॉलिवूडमध्ये होणार एण्ट्री; पोस्टवर शाहरुख-गौरीची कमेंट आहे खास

Aryan Khan: शाहरुख खानचा मुलगा आर्यनची मोठी घोषणा; बॉलिवूडच्या पहिल्या प्रोजेक्टची दाखवली झलक
Aryan Khan and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 8:18 AM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ऐकायला मिळत होत्या. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. खुद्द आर्यन खाननेच याची घोषणा केली आहे. मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्यनने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र वडील शाहरुख आणि बहीण सुहाना यांच्याप्रमाणे तो अभिनयक्षेत्रात नव्हे तर लेखन क्षेत्रातून पदार्पण करणार आहे. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीप्टचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख आणि गौरी यांचं प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’कडून होणार आहे.

‘लेखनाचं काम पूर्ण झालं, आता ॲक्शन म्हणण्यासाठी उत्सुक आहे’, असं कॅप्शन आर्यनने या फोटोला दिलं आहे. मात्र त्याच्या या चित्रपटात कोणते कलाकार असणार याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा

आर्यनने हा फोटो पोस्ट करताच त्यावर अनेकांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होऊ लागला. ‘हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे’, असं आई गौरी खानने लिहिलंय. तर संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर हिनेसुद्धा आनंद व्यक्त केला. अनन्या पांडेची आई भावना पांडे हिने ‘खूप प्रेम’ अशी कमेंट केली.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी आर्यन हा शाहरुखच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये मदत करत होता. यावर्षी त्याने बहीण सुहाना खानसोबत दुबईत पार पडलेल्या इंटरनॅशनल लीग टी-20 ट्रॉफी लाँचलाही हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून तो विविध पार्ट्यांमध्येही हजेरी लावताना दिसतोय.

गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यनला अटक झाली होती. बरेच दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी त्याला आता क्लीन चिटही मिळाली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.