‘दुसऱ्यांची बहीण असती तर?’, सुहानासोबत फोटोसाठी पोझ देताना आर्यन खानची ‘ती’ गोष्ट चर्चेत

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध कमेंट्स येत आहेत. अनेकांनी आर्यनला 'जेंटलमन' असं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय, 'बहिणच आहे ती, त्यात इतकी काय फॉर्मेलिटी?' आर्यनने दुसऱ्या मुलींनाही अशी वागणूक दिली तर त्याला 'जेंटलमन' म्हणता येईल, असंही एका युजरने लिहिलंय.

'दुसऱ्यांची बहीण असती तर?', सुहानासोबत फोटोसाठी पोझ देताना आर्यन खानची 'ती' गोष्ट चर्चेत
Aryan Khan and Suhana KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:49 AM

मुंबई : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला देशभरातील आणि परदेशातील नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, सोनम कपूर, सलमान खान, शाहरूख खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ग्लॅमरस अंदाजात या कार्यक्रमात एण्ट्री केली. याशिवाय ‘स्पायडर मॅन’ फेम अभिनेता टॉम होलँड, अभिनेत्री झेंडाया, अमेरिकी सुपरमॉडेल गिगी हदिद, स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोपे क्रूझ यांनीसुद्धा भव्यदिव्य कार्यक्रमात हजेरी लावत सर्वांचं लक्ष वेधलं. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय विशेष चर्चेत होते. पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी अनेकदा एकत्र पोझ दिले.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात सलमान खानने शाहरुखच्या कुटुंबीयांसोबत फोटो काढले. यावेळी आर्यननेही सलमानसोबत फोटोसाठी पोझ दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी आणि सुहाना खान यांचा ‘देसी’ अंदाज पहायला मिळाला. या दोघींनी चमचमणाऱ्या साड्या नेसल्या होत्या. मात्र यावेळी जेव्हा आर्यन आणि सुहानाने फोटोसाठी पोझ दिले, तेव्हा सर्वांचं लक्ष आर्यनकडे वेधलं होतं. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओमध्ये आर्यन आणि सुहाना फोटोसाठी पापाराझींसमोर उभे राहतात. यावेळी आर्यनच्या हाताकडे नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं गेलं. कारण फोटो काढताना आर्यनने जाणीवपूर्वक सुहानापासून त्याचा हात थोडा थांब ठेवला होता. आर्यनचा हात सुहानाच्या मागे कमरेजवळ होता. मात्र तिला स्पर्श होऊ नये म्हणून त्याने हाताची मूठ थोडं लांब धरून फोटोसाठी पोझ दिले.

पहा व्हिडीओ

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध कमेंट्स येत आहेत. अनेकांनी आर्यनला ‘जेंटलमन’ असं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय, ‘बहिणच आहे ती, त्यात इतकी काय फॉर्मेलिटी?’ आर्यनने दुसऱ्या मुलींनाही अशी वागणूक दिली तर त्याला ‘जेंटलमन’ म्हणता येईल, असंही एका युजरने लिहिलंय.

कल्चरल सेंटरच्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात शाहरुख खानने ‘पठाण’ या चित्रपटातील ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर डान्स केला होता. त्याच्यासोबत मंचावर वरुण धवन आणि रणवीर सिंगनेही ठेका धरला होता. वडिलांना स्टेजवर डान्स करताना पाहून खुश झालेल्या आर्यन खानचा आणखी एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो शाहरुखकडे अत्यंत कौतुकाने पाहताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.