Adipurush : ‘तुम्ही तर भारताचे गुलाम’, परदेशात आदिपुरुष चित्रपटावरुन खवळलेल्या नेत्याच कोर्टाबद्दल वक्तव्य
Adipurush : प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आदिपुरुष चित्रपटावरुन फक्त भारतातच वाद सुरु नाहीय. परदेशातही या चित्रपटाला मोठा विरोध होत आहे. हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. आता तिथले लोक कोर्टाचा आदेश मानायलाही तयार नाहीयत.
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाला भारतात मोठा विरोध आहेच. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आदिपुरुष चित्रपटातील अनेक संवाद आक्षेपार्ह आहेत. रामायणावर आधारित आदिपुरुष चित्रपटामुळे भावना दुखावल्या असा अनेक प्रेक्षकांच म्हणणं आहे. भारताप्रमाणे आदिपुरुष चित्रपटाला शेजारच्या नेपाळमध्येही विरोध होत आहे. नेपाळच्या कोर्टाने गुरुवारी या चित्रपटा संदर्भात एक महत्वाचा निर्णय दिला.
नेपाळच्या कोर्टाने आदिपुरुषसह सर्व हिंदी चित्रपटांवरील बंदी उठवली. देशाच्या सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिलेल्या एकाही चित्रपटाच स्क्रिनिंग थांबवू नका, असा आदेश दिला.
कुठल्या डायलॉगवरुन आक्षेप?
कोर्टाच्या या आदेशामुळे हिंदी चित्रपटांचा नेपाळमध्ये प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय. आदिपुरुष चित्रपटात एक डायलॉग आहे, त्यात सीता भारताची मुलगी असल्याच म्हटलं आहे. याच डायलॉगवर आक्षेप घेत, काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.
‘कुठलीही शिक्षा भोगायला तयार’
“हा नेपाळची सप्रभुता आणि स्वातंत्र्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही” अशी बालेंद्र शाह यांनी भूमिका घेतली आहे.
पुढे काय होणार?
सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी घेतलेल्या चित्रपटांच प्रदर्शन रोखू नये, असा आदेश पाटन हायकोर्टाचे न्यायाधीश धीर बहाद्दूर चंद यांनी दिला. याचिकाकर्ते कोर्टाच्या लिखित आदेशाची प्रतिक्षा करतायत. असं नेपाळ मोशन पिक्चर्स असोशिएशनचे अध्यक्ष भास्कर धुनगाना यांनी सांगितलं. ‘सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिलेल्या सर्व चित्रपटाचं प्रदर्शन करु’ असं त्यांनी सांगितलं.
नेपाळमध्ये सीतेच जन्मस्थान कुठे आहे?
सीता भारताची मुलगी असल्याच्या डायलॉगवरुन सोमवारी नेपाळमध्ये आदिपुरुष आणि अन्य हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली. सीतेचा जन्म नेपाळमध्ये झाला असं तिथल्या लोकांच म्हणण आहे. दक्षिणपूर्व नेपाळच्या जनकपूर येथे सीतेचा जन्म झाल्याचा अनेकजण मानतात. कोर्टाचा आदेश मानणार नाही असं बालेंद्र शाह यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलय?
“नेपाळवर भारताच राज्य होतं, असं चित्रपटाच्या लेखकाने म्हटलय. यातून भारताचा वाईट हेतू दिसून येतो. चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोर्टाने परवानगी दिलीय, याचा अर्थ नेपाळवर भारताच राज्य होतं हे मान्य करण्यासारख आहे कोर्ट आणि नेपाळ सरकार दोघे भारताचे गुलाम आहेत” असं असं बालेंद्र शाह यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार, पण….’
“मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही” असं बालेंद्र शाह यांनी म्हटलय. काठमांडूच्या महापौरांनी आदिपुरुष चित्रपटावर बंदी घातल्यानंतर धारणचे महापौर समपांग आणि पोखराच्या महापौरांनी तोच कित्ता गिरवला. त्यामुळे नेपाळमध्ये आदिपुरुष चित्रपटाचे खेळ थांबले.