लाडकी बहीण योजना तेव्हा आली असती तर मी दोन वेळा जेवले असते; आशा भोसले यांच्याकडून योजनेचं कौतुक
Ladki Bahin Yojana:आशा भोसले यांच्याकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चं कौतुक; म्हणाल्या, 'लाडकी बहीण योजना तेव्हा आली असती तर मी दोन वेळा जेवले असते...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशा भोसले यांच्या वक्तव्याची चर्चा...
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या माध्यमातून दरमहा महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा केले जात आहे. योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठ गाव-खेड्यापासून शहरापर्यंत महिलांनी गर्दी केली. अनेकांनी योजनेचं कौतुक देखील केलं. आता ख्यातनाम गायिका आशा भोसले यांनी देखील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक केलं आहे.
शनिवारी झालेल्या अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात आशा भोसले यांनी योजनेचं कौतुक केलं आहे. 1947 मध्ये योजना सुरु केली असती तर मी दोन वेळंचं जेवले असते… असं म्हणत गायिका आशा भोसले यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक केलं आहे.
लाडक्या बहिणींना तुम्हा जे पंधराशे रुपये दिलेले आहेत, त्याची व्यथा आणि आनंत माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही. हे काम जर 1947 साली कोणी केलं असतं, पंधराशे रुपये मिळाले असते, तर मी दोन वेळ जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं…. मी जेवण संभाळून ठेवणं शिकलं होतं कारण मी दुपारी जेवू शकत नव्हते कारण जेव्हा पती घरी यायचे तेव्हा दोघे मिळून आम्ही खायचो… तेवढंच जेवण माझ्याकडे होतं… असं आशा भोसले म्हणाल्या.
शिवया ज्या महिलांकडे पैसे नाहीत, त्यांच्यासाठी पंधराशे रुपये फार मोठी रक्कम आहे.. असं देखील ‘लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक करत आशा भोसले म्हणाल्या… शनिवारी झालेल्या अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात बोलत होत्या. सध्या सर्वत्र आशा भोसले यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. अनेक सेलिब्रिटींनी देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते.