Ashish Vidyarthi | ‘ती ५० वर्षांची आहे आणि मी….’, दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांचा मोठा खुलासा

'नात्यात आलेले उतार - चढाव....', आशिष विद्यार्थी पहिल्या पत्नीपासून का झाले विभक्त? दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याने व्हिडीओ पोस्ट करत केला मोठा खुलासा

Ashish Vidyarthi | 'ती ५० वर्षांची आहे आणि मी....',  दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 5:42 PM

मुंबई : ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक सारखी होष्ट असते, ती म्हणजे आनंद.. मला कोणत्या रिलेशिपमध्ये नव्हतं राहायचं म्हणून मी रुपालीला लग्नासाठी विचारलं.. तिने होकार दिला.. ‘ बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत लग्न केलं आहे. रुपाली हिच्यासोबत आशिष विद्यार्थी यांचं दुसरं लग्न आहे.. आशिष आणि रुपाली यांनी लग्न मोठ्या थाटात नाही तर, अत्यंत साध्या पद्धतीत केलं. दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र आशिष विद्यार्थी यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.. अभिनेत्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात… पण आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आनंद.. प्रत्येकाला आनंदाने जगाचं आहे. २२ वर्षांपूर्वी माझ्या आयु्ष्यात राजोशी बरुआ आली.. पती-पत्नी म्हणून आम्ही आनंदी होतो.. पण गेल्या दोन वर्षांमध्ये आम्हाला चित्र वेगळं दिसू लागलं… आम्हाला वाटत होतं तसं भविष्य आम्हाला दिसत नव्हतं. नात्यात आलेले उतार – चढाव दूर होवू शकतात. त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील केले. पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी आम्ही सोबत राहिलो असतो पण खासगी आयुष्यात मात्र दुःखी असतो. ही गोष्ट आम्हाला नको होती..’

हे सुद्धा वाचा

पुढे आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘आम्ही सोबत राहण्याचा निर्णय घेतला पण आपले मार्ग वेगळे असतील.. असं आमचं ठरलं… बसून मार्ग काढला.. मित्र, कुटुंबासोबत आम्ही चर्चा केली.. मला एकटं राहायला आवडत नाही. मला सोबत कोणी तरी हवं आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यात एक अशी व्यक्ती भेटेल जिला मी जोडीदार बनवू शकेल… असं मला माहित होतं…’

‘देवाकडे मी पुन्हा जोडीदाराची इच्छा व्यक्त केली. गेल्यावर्षी मी त्यांनी भेटलो आणि आमचं बोलणं सुरु झालं.. एका वर्षात आम्ही भेटलो, चॅट केलं… तेव्हा मला वाटलं मी रुपाली बरुआ हिच्यासोबत मी आनंदी आयुष्य जगू शकतो.. मला कोणत्या रिलेशिपमध्ये नव्हतं राहायचं म्हणून मी रुपालीला लग्नासाठी विचारलं.. तिने होकार दिला.. ती ५० वर्षांची आणि आणि ५७ वर्षांचा आहे ६० वर्षांचा नाही..’ असं देखील आशिष विद्यार्थी म्हणाले…

आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी याचं पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री शंकुतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झालं होतं. पहिल्या लग्नानंतर वयाच्या ५७व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे..

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.