Ashish Vidyarthi यांची दुसरी पत्नी आहे एका मुलीची आई; ५० व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

पतीच्या निधनानंतर रुपाली बरुआ हिच्यावर तरुण मुलीची जबाबदारी; ५७ वर्षीय अशिष विद्यार्थी यांच्यासोबत लग्न केल्यामुळे चर्चांना उधाण..., सर्वत्र रुपाली बरुआ यांच्या लेकीची चर्चा...

Ashish Vidyarthi यांची दुसरी पत्नी आहे एका मुलीची आई; ५० व्या वर्षी घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 11:47 AM

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी तर रुपाली बरुआ हिने वयाच्या ५० व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. सध्या बॉलिवूड आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, लग्नानंतर आशिष यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत लग्नाची माहिती दिली. आशिष यांच्या प्रमाणेच रुपाली हिचं देखील दुसरं लग्न आहे. रुपाली एका मुलीची आई आहे. सोशल मीडियावर रुपाली कायम तिच्या मुलीसोबत फोटो पोस्ट करत असते. पण आशिष विद्यार्थी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर रुपाली तुफान चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र रुपाली आणि तिच्या मुलीबद्दल देखील चर्चा रंगत आहे.

रुपाली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती ५० वर्षांची असून एक प्रसिद्ध उद्योजिका आणि सोशल मीडिया स्टार देखील आहे. शिवाय कोलकाता याठिकाणी तिचं स्वतःचं फॅशन स्टोर आहे. रुपाली फॅशल इंडस्ट्रीमध्ये अधिक सक्रिय असते. सध्या रुपाली तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपाली हिच्या पहिल्या पतीचं नाव मीतम बरुआ असं आहे.

हे सुद्धा वाचा

मीतम बरुआ आता या जगात नाहीत. मीतम बरुआ आणि रुपाली बरुआ लग्नानंतर इंग्लंड याठिकाणी राहायचे. मीतम आणि रुपाली यांची एक मुलगी देखील आहे. परदेशात दोघांनी एक क्लोदिंग ब्रान्ड देखील सुरु केला होता. पण दोन वर्षांनी क्लोदिंग ब्रान्ड बंद करावा लागला. गंभीर आजारामुळे मीतम बरुआ यांचं इंग्लंड याठिकाणी निधन झालं.

पहिल्या पतीच्या निधनानंतर रुपाली मुलीसोबत पुन्हा भारतात परतली. भारतात परतल्यानंतर रुपाली हिने स्वतःचा क्लिदिंग ब्रान्ड सुरु केला. महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर रुपाली हिची मुलगी सक्रिय नाही. पण रुपाली मुलीसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आशिष यांच्यासोबत लग्न केल्यामुळे रुपाली आणि तिची मुलगी तुफान चर्चेत आली आहे.

रुपाली बरुआ संपत्ती

रिपोर्टनुसार रुपाली हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, तिच्याकडे जवळपास ८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. रुपाली मॉडेलिंग, जाहिराती आणि सोशल मीडियाच्यामाध्यमातून कमाई करते. एवढंच नाही तर, रुपाली उद्योजिका आहे.. रुपाली प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लूएन्सर देखील आहे. सोशल मीडियावर रुपालीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे..

पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त
पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त.
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल.
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?.
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण.
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?.
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?.
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'.
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ.
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय.