Ashish Vidyarthi | ‘विषाच्या थेंबासारखं…’, आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाची प्रतिक्रिया

वयाच्या ५७ आईला सोडून आशिष विद्यार्थी यांनी दुसरा संसार थांटल्यानंतर कशी होती मुलगा अर्थ याची प्रतिक्रिया? जाणून व्हाल हैराण

Ashish Vidyarthi | 'विषाच्या थेंबासारखं...', आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 10:07 AM

मुंबई | अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर देखील त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. आयुष्याच्या या टप्प्यावर आशिष यांनी लग्न केल्यामुळे अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं तर, दुसरीकडे नव्या आयुष्याला सुरुवात केल्यामुळे अनेकांनी आशिष विद्यार्थी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. सध्या त्यांच्या लग्नाचे नवीन फोटो देखील सोशल मीडियावर समोर येत आहेत. दरम्यान, दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी आणि राजोशी बरुआ यांचा मुलगा अर्थ याची काय प्रतिक्रिया होती. यावर अभिनेत्याने मैन सोडलं आहे..

आशिष विद्यार्थी मुलाबद्दल म्हणाले, ‘जेव्हा आपण आई-वडील होतो, तेव्हा पालकांचं पूर्ण जीवन त्यांच्या मुलांच्या भोवती फिरतं.. पण एक गोष्ट विसरता कामा नये आणि ती म्हणजे आई – वडील देखील माणूस आहेत.. त्यांच्यामध्ये काही मतभेद असू शकतात.. दोघांमधील मतभेद वाढल्यानंतर एकत्र राहणं फार कठीण असतं..’ असं देखील आशिष विद्यार्थी म्हणाले…

‘विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी घेतलेला निर्णय मुलगा अर्थ याला सांगणं फार कठीण वाटत होतं. मनात एकत्र भावना होत्या. मुलासमोर जायची भीती वाटत होती. अनेक अडचणी देखील आल्या. आम्हाला दोघांना आमच्या मुलाला असं आयुष्य द्यायचं नव्हतं. पण एकत्र राहू देखील शकत नव्हतो. आमच्या निर्णयाचा अर्थवर काय परिणाम होईल माहिती नव्हतं. सर्व काही विषाच्या थेंबासारखं वाटत होतं. ‘

हे सुद्धा वाचा

अर्थशी बोलणे खूप अवघड होतं. आम्ही विभक्त होतोय याबाबत समजल्यानंतर अर्थने आनंद व्यक्त केला. आशिष म्हणाले, ‘अर्थ याला आनंद झाला की त्याचे पालक एकमेकांना त्रास देण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेत आहेत. असं देखील आशिष विद्यार्थी म्हणाले..

बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. रुपाली हिचं देखील आशिष यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. रुपाली हिला एक मुलगी असून तिच्या पहिल्या पतीचं निधन झालं आहे. कोलकाता याठिकाणी ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत आशिष विद्यार्थी यांनी लग्न केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.