हीट चित्रपट देणा-या आशुतोष गोवारीकरला पेलावं लागलं होतं आवाहन
लगान, स्वदेश आणि अकबर सारख्या मोठ्या चित्रपट पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या करिअरला एक मोठी कलाटणी मिळाली त्यामुळे त्यांचं नाव एका टॉप लेवलच्या दिग्दर्शन यादीत गेलं आहे. त्यांनी त्यांची ओळख अभिनेता, दिग्दर्शन, लेखक आणि निर्माता अशी ठेवली आहे.
मुंबई – आशुतोष अशोक गोवारीकर (ashutosh ashok govarikar) सिनेमातलं एक मोठं आपण म्हणू शकतो. कारण आशुतोष गोवारीकरांनी आत्तपर्यंत अनेक चांगले सिनेमे (cinema) त्यांच्या चाहत्यांना, चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यामुळं त्यांच्या नावाला एक वेगळं वलय आल्याचं पाहायला मिळतंय. कारण एखादा चित्रपट करायचा आणि त्याला पारितोषिक मिळवणं शक्य नसतं. पण हे करून दाखवलं आहे आशुतोष गोवारीकरांनी, त्यांचे वडिल पोलिस अधिकारी होते. तसेच त्यांचा जन्म कोल्हापूरात (kolhapur) झाला आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याचा किंवा कामाचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. त्यांचं दिग्दर्शन इतकं भारी आहे की, त्यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक चित्रपटांना पुरस्कार मिळाला आहे. लगान, स्वदेश आणि जोधा अकबर अशा मोठ्या चित्रपटांसाठी आशुतोष गोवारीकरांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांच्या कामगिरीने जसे घरचे खुश आहेत. तसेच त्यांचा चाहतावर्ग देखील खूष असल्याचा पाहायला मिळतो. कोरोनाच्या काळात त्यांचे अनेक प्रोजेक्ट पुढे ढकलले असल्याची माहिती मिळते. परंतु येत्या काळात त्यांच्याकडून तुम्हाला चांगले चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
त्यांच्या मोठ्या सिनेमांना पुरस्कार
आशुतोष गोवारिकर यांनी महाराष्ट्रातील मिठीबाई महाविद्यालयात महाविद्यालय पूर्ण केले. त्यांचे उच्च शिक्षण बी.एस.सी. रसायनशास्त्रात झाले आहे. वडिल पोलिस अधिकारी असल्याने त्यांनी शिक्षण चांगलं घेतलं. तसेच त्यांना सिनेमा क्षेत्रात काम करायचं असल्याने त्यांनी सुरूवातीपासून त्या क्षेत्राकडे कल होता. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना सिनेमा यश मिळाले. एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान त्यांच्यात आणि साजिद खानच्यात वाद शाब्दिक वाद झाला होता. त्यामुळे आशुतोष गोवारीकर काही काळ वादात सापडले होते. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सिनेमात अभिनेत्याचं काम केलंय तर अनेक चित्रपटात दिग्दर्शनाचं काम केलं आहे. लगान, स्वदेश आणि अकबर सारख्या मोठ्या चित्रपट पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या करिअरला एक मोठी कलाटणी मिळाली त्यामुळे त्यांचं नाव एका टॉप लेवलच्या दिग्दर्शन यादीत गेलं आहे. त्यांनी त्यांची ओळख अभिनेता, दिग्दर्शन, लेखक आणि निर्माता अशी ठेवली आहे.
काम करत असताना आलेलं आवाहन
मला एक रोमँटिक प्रेमकथा बनवायची होती. लगान आणि स्वदेस हे मोठे चित्रपट होते, पण ते प्रेमकथा नव्हते. दोन्ही चित्रपटांमध्ये रोमान्स हा मुख्य विषय नव्हता. 1562 ची ही प्रेमकथा आवडली, दोन भिन्न धर्म आणि संस्कृतीचे लोक कसे एकत्र आले ? त्यांच्या
त प्रेम कसं झालं ? जो काळ आपण पडद्यावर पाहिलाच नाही तो काळ कसा आणायचा हेही आव्हान होतं. त्या कालावधीचा कोणताही दृश्य पुरावा नाही. यामध्ये मला नितीन देसाई आणि इतर तंत्रज्ञांची मदत मिळाली असं संतोष गोवारीकरांनी सांगितलं. कारण चित्रपट तयार करीत असताना अशी अनेक आव्हाने तुम्हाला पेलावी लागतात. कोणत्याही गोष्टीत संघर्ष आणि डेरिंग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही.