Anant Ambani Wedding : ‘राधिकाला पाहिल्यानंतर माझ्या हृदयात भूकंप…’ लग्नाआधी काय म्हणालेले अनंत अंबानी?

Anant Ambani Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांची आज जन्मोजन्मीसाठी गाठ बांधली जाणार आहे. सात वर्षांपासून राधिका-अनंत ऐकमेकांना ओळखतात. प्री-वेडींगच्या एका कार्यक्रमात अनंत अंबानी यांनी राधिकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Anant Ambani Wedding : 'राधिकाला पाहिल्यानंतर माझ्या हृदयात भूकंप...' लग्नाआधी काय म्हणालेले अनंत अंबानी?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आज (शुक्रवार) बिझनेसमन वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. या वर्षातील हे सर्वांत मोठं लग्न आहे. बॉलिवूड, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नामांकित सेलिब्रिटी या शाही लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाचं संपूर्ण शेड्युल समोर आलं आहे. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 3:23 PM

आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांची जन्मोजन्मीसाठी गाठ बांधली जाणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा विवाह संपन्न होणार आहे. या लग्नाची आज देश-विदेशात चर्चा आहे. कारण फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी, कलाकार, उद्योजक या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. अनंत-राधिका यांच्या विवाह सोहळ्यात बऱ्याच गोष्टी भव्य-दिव्य, डोळे दिपवून टाकणाऱ्या आहेत. आज हे लग्न होत असलं, तर त्याचे विधी, अन्य फंक्शन बऱ्याच आधी सुरु झालेत.

काही महिन्यांपूर्वी जामनगरमध्ये प्री-वेडींग फंक्शन झालं होतं. जामनगरमध्ये रिलायन्सची कार्यालय, प्लान्ट आहे. जामनगरमध्ये तीन दिवस चाललेल्या या सोहळ्याला ग्लॅमर, उद्योग विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. जामगनरमध्ये झालेल्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात अनंत अबांनी होणारी पत्नी राधिका मर्चेंट बद्दल बोलले होते.

राधिकाबद्दल अनंत अंबानी काय म्हणालेले?

“आता मी राधिकाच्या विषयावर येतो. मी 100 टक्के नशिबवान आहे, यात अजिबात शंका नाही. मला माहित नाही, राधिका माझ्या आयुष्यात कशी आली?. मी खरच भाग्यवान आहे. राधिका माझ्यासोबत मागच्या सात वर्षांपासून आहे. मला आजही असं वाटत की, मी राधिकाला कालच भेटलोय. प्रत्येक दिवसागणिक माझं तिच्यावरच प्रेम वाढत चाललय. माझ्या बहिणीला डेट करत असताना मेहुणा म्हणायचा की, तिला पाहताच त्याच्या हृदयात ज्वालामुखी आणि कारंजे उफाळून यायचे. त्याचप्रमाणे मी म्हणेन की राधिकाला पाहिल्यानंतर माझ्या हृदयात भूकंप आणि त्सुनामी उफाळून येतात. राधिका तुझे मनापासून आभार” अशा शब्दात अनंत अंबानी यांनी राधिकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.