सुनील शेट्टी यांच्या कुटुंबात होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री, शेट्टी कुटुंबात आनंदाचं वातावरण
2025 मध्ये सुनील शेट्टी यांच्या कुटुंबात होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री, 'ती' पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुनील शेट्टी यांच्या कुटुंबाची चर्चा....
बॉलिवूडचे अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. दोघांनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 2025 मध्ये अथिया पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. पोस्ट शेअर केल्यानंतर फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त केएल राहुल – अथिया शेट्टी यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री अथिया शेट्टी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आमचा सुंदर आशीर्वाद 2025 मध्ये येणार आहे…’ असं अभिनेत्रीने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे. सध्या केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार आहेत.
View this post on Instagram
अथिया शेट्टी – केएल राहुल यांचं लग्न
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं लग्न 23 जानेवारी, 2023 रोजी खंडाळ्या येथील सुनील शेट्टीच्या बंगल्यावर झालं. दोघांच्या लग्नासाठी बॉलिवूड आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीतील स्टार्स आणि त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
एवढंच नाही तर, अथिया शेट्टी – केएल राहुल यांनी देखील लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. अथिया कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. शिवाय अभिनेत्री कायम पतीवर असलेलं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते.
अथिया शेट्टी सिनेमे
अथिया शेट्टी हिने ‘हिरो’ सिनेमातून चाहत्यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. अथियाचा ‘मोतीचूर चकनाचूर’ सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर अथिया कोणत्याच सिनेमात दिसली नाही. शिवाय अथियाने कोणत्या आगामी प्रोजेक्टची देखील घोषणा केली नाही. अथियाला बॉलिवूडमध्ये वडिलांप्रमाणे ओळख निर्माण करता आली नाही.