लग्नानंतर Athiya Shetty – KL Rahul नाही जाणार हनीमूनसाठी ; काय आहे कारण?
जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि राहुल यांनी गेल्या वर्षी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. सोमवारी दोघे लग्नबंधनात अडकले, अथिया आणि राहुल यांच्या लग्नानंतर नवीन जोडप्याबाबतील अनेक गोष्टी समोर येत आहेत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लग्न केल्यानंतर अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी देखील लग्न केलं. जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि राहुल यांनी गेल्या वर्षी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. अथिया आणि राहुल खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्न सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अथियाच्या लग्नानंतर अभिनेते सुनील शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई देवून आनंद साजरा केला.
अथिया आणि राहुल यांच्या लग्नात इशांत शर्मा आणि वरुण आरोन यांसारख्या क्रिकेटर्ससोबतच डायना पेंटी, आकांक्षा रंजन कपूर, अंशुला कपूर, अनुपम खेर आणि कृष्णा श्रॉफ यांसोबतच अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अथिया आणि राहुल यांच्या लग्नात काही ठरावीक पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण दोघांचं रिसेप्शन मात्र मोठ्या थाटात पार पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटच्या शेड्यूलमुळे क्रिकेट आणि बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. अथिया आणि राहुल यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी तब्बल ३ हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचं कळत आहे. मे महिन्यात रिसेप्शन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अथिया आणि राहुल यांच्या लग्नानंतर नवीन जोडप्याबाबतील अनेक गोष्टी समोर येत आहेत. अथिया आणि राहुल लग्नानंतर हनीमुनसाठी जाणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, कमिटमेंट्स आणि व्यस्त वेळापत्रकामुळे अथिया आणि राहुल हनीमुनसाठी जाणार नाहीत. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट् देखील लग्नानंतर हनीमुनसाठी गेले नव्हते.
अथियाने नुकताच स्वतःचं यूट्यूब चॅनल लाँच केलं आहे. तर दुसरीकडे राहुल सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामन्यासाठी तयारी करत आहे. सामना ९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. असं देखील सांगण्यात आहे की, अथिया आणि राहुल काम संपल्यानंतर युरोप याठिकाणी हनीमूनसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.