Atique Ahmed | ‘ही काही साजरी करण्यासारखी गोष्ट नाही’; अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करचं ट्विट चर्चेत
माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करचं ट्विट चर्चेत आलं आहे. ही अराजकता आहे असं म्हणत तिने पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. या घटनेवर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या बेधडक मतांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेसुद्धा या घटनेबाबत ट्विट केलं आहे.
काय म्हणाली स्वरा?
‘कायदेशीर अधिकाराशिवाय एखाद्या व्यक्तीची जाणीवपूर्वक हत्या किंवा एन्काऊंटर ही काही साजरी करण्यासारखी गोष्ट नाही. ही अराजकतेची स्थिती दर्शवते. राज्यातील संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, हे यातून सूचित होतं. कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत आणि गुन्हेगारांना सक्षम करत आहेत. याला भक्कम शासन म्हणता येणार नाही, ही अराजकता आहे’, असं तिने ट्विट केलंय.
An extra judicial killing or an encounter is not something to be celebrated. It signals a state of lawlessness. It signals that the State agencies have depleted credibility because they are acting like or enabling criminals. This is not strong governance, this is anarchy.
— Swara Bhasker (@ReallySwara) April 15, 2023
स्वरा भास्करच्या पतीचं ट्विट-
स्वरा भास्करचा पती आणि समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यानेसुद्धा याप्रकरणी ट्विट केलं आहे. ‘अनेकांना वाटेल की आम्ही मुस्लिम आहोत म्हणूनच आम्ही असद अहमदच्या एन्काऊंटरला विरोध करत आहोत. मात्र हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही विकास दुबेच्या एन्काऊंटरचंसुद्धा समर्थन केलं नव्हतं आणि कधी करणारही नाही. मला तुमच्याशी समस्या आहे. तुमचा राज्यघटना आणि संस्थांवर विश्वास नाही. असदचं प्रकरणं एकदम स्पष्ट होतं. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती आणि तो आयुष्यभर तुरुंगात राहिला असता. जर तुरुंगातून त्याने गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला सरकार जबाबदार असती. बुलडोझरने किंवा एन्काऊंटरने गुन्हेगारी संपेल या भ्रमात तुम्ही लोकं आहात. पण बुलडोझर आणि एन्काऊंटरने फक्त हुकूमशाही येईल बाकी काही नाही’, असं त्याने म्हटलंय.
बहुत लोगो को लगता होगा के हम मुसलमान है इसलिये #AsadAhmadEncounter का विरोध कर रहे है, आपकी ग़लतफ़हमी है ना हमने विकास दूबे के एनकाउंटर का जश्न मनाया था और ना कभी आगे किसी और का मनायेंगे
समस्या आपके साथ है आप संविधान और उसकी संस्थाओं पर यक़ीन नहीं करते है, असद का केस 1/2
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) April 13, 2023
बिलकुल क्लियर था उसको उम्र क़ैद तो होती है ज़िंदगी भर जेल में रहता और जेल से अगर वो गुंडागर्दी करने की कोशिश करता तो सरकार की ज़िम्मेदारी होती
आप लोग भ्रम में है के क्राइम किसी बुलडोज़र या एनकाउंटर से ख़त्म हो जायेगा, बुलडोज़र और एनकाउंटर से सिर्फ़ तानाशाही आयेगी और कुछ नहीं 2/2
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) April 13, 2023
अतिकवर विविध प्रकारचे सुमारे 100 गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असाद आणि असादचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झाशी इथलं पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर शनिवारी अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांना उमेल पाल हत्येप्रकरणात पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्यावेळी हल्ला झाला.