Atrangi Re Trailer : अक्षय कुमार आणि धनुष ‘या’ दोघांच्या प्रेमात सारा अली खान; अतरंगी है लव्ह ट्रँगल

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झालाय. ही एक लव्ह ट्रँगल स्टोरी आहे, जी चित्रपटात अतिशय अनोख्या पद्धतीने दाखवण्यात आलीय. अतरंगी रे ख्रिसमसच्या मुहूर्तावर OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.

Atrangi Re Trailer : अक्षय कुमार आणि धनुष 'या' दोघांच्या प्रेमात सारा अली खान; अतरंगी है लव्ह ट्रँगल
Aatrangi Re
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 5:42 PM

नवी दिल्लीः सारा अली खान(Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay kumar) आणि धनुष (Dhanush) यांच्या अतरंगी रे या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झालाय. ही एक लव्ह ट्रँगल स्टोरी आहे, जी चित्रपटात अतिशय अनोख्या पद्धतीने दाखवण्यात आलीय. अतरंगी रे ख्रिसमसच्या मुहूर्तावर OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, सोशल मीडियावर त्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांना एक नवीन जोडी नव्या रुपात पाहायला मिळणार असून, त्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचलीय.

अखेर अतरंगीचा ट्रेलर रिलीज

अतरंगी रेचा 3 मिनिटे 8 सेकंदाचा ट्रेलरमध्ये आपल्याला सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार पाहायला मिलतोय. सारा अली खान (रिंकू सूर्यवंशी) शी विवाह केलेल्या धनुष (विशू) ला पकडताना काही लोक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. विशू म्हणजेच धनुष तमीळ आहे आणि त्याला रिंकू म्हणजेच साराशी लग्न करायचे नाही. सगळी मनस्थिती तिथे दाखवली जातेय. काही लोकांवर बाटली फेकून तिची एन्ट्री होते. रिंकू आणि विशूने जबरदस्तीने लग्न केलेय. त्यामुळे या लग्नानं दोघेही नाखूश असल्याचं दाखवण्यात आलंय. दिल्लीला पोहोचल्यानंतर दोघेही आपापल्या मार्गावर जाणार असल्याचंही ते ठरवत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय.

रिंकू जादूगार अक्षय कुमारच्या (शेहजाद) प्रेमात

त्यानंतर रिंकू सर्कसमध्ये काम करणाऱ्या जादूगार अक्षय कुमारच्या (शेहजाद) प्रेमात पडते. पण सांगितल्याप्रमाणे हा एक प्रेम त्रिकोण आहे आणि शेवटी रिंकू आणि विशू एकमेकांच्या प्रेमात पडतात. या अतरंगी लव्हस्टोरीमध्ये रिंकूलाही विशू हवा आहे आणि शेहजादला स्वतःपासून दूर ठेवायचे नाही. आता या कथेचा शेवट काय होणार, हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच समजणार आहे.

सारा आणि धनुषची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय

चित्रपटात फुल ऑन ड्रामा, गाणे आणि रोमान्स पाहायला मिळणार आहे. सारा आणि धनुषची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारची एंट्रीही खूपच वेगळी दिसत आहे. तो हत्तीवर येतो आणि स्वतःला सर्कसमध्ये फिरतो. साराच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. ती तिच्या व्यक्तिरेखेत खूप आत्मविश्वासाने भारलेली दिसतेय. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केलेय. हा चित्रपट 24 डिसेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातम्या

कपिल शर्मा शोच्या सेटवर स्मृती इराणींना ‘नो एंट्री’! पाहा नेमकं काय घडलं?

चॉपरमधून सुष्मिता सेनची जबरदस्त एंट्री, ‘आर्या सीझन 2’चे मोशन पोस्टर पाहिले का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.