अतुल परचुरेंवर कर्करोगाचे झालेले चुकीचे उपचार, डॉक्टरांनी दिलेले ‘ते’ 2 पर्याय

Atul Parchure: अतुल परचुरे यांच्यावर धक्कादायक एक्झिट, कर्करोगाच्या झालेल्या चुकीच्या उपचारांवर स्वतः व्यक्त झाले होते अतुल परचुरे, डॉक्टरांनी दिलेले 'ते' 2 पर्याय, अतुल परचुरे यांच्या निधनामुळे सिनेविश्वात शोककळा

अतुल परचुरेंवर कर्करोगाचे  झालेले चुकीचे उपचार, डॉक्टरांनी दिलेले 'ते' 2 पर्याय
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 8:21 AM

Atul Parchure: फक्त मराठीच नाही तर, हिंदी विश्वात देखील आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना पोट धरून हासवणारे अभिनेते अतुल परचुरे यांच्या एक्झिटमुळे सिनेविश्व आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात देखील केली होती. गेल्या वर्षी स्वतःच्या अतुल परचुरे यांनी कॅन्सर आणि झालेल्या चुकिच्या उपचारांवर मोठं वक्तव्य केलं होतं.

काय म्हणाले हेते अतुल परचुरे?

गंभीर आजाराबद्दल अतुल परचुरे म्हणाले होते, ‘माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला येथे गेलो होतो. पण काही दिवसांनंतर मला जाणवलं की काही खावसं वाटत नाहीये. त्यानंतर आठ दहा दिवस काही औषध घेतली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मला वाटलं प्रकृती अधिक खालावत आहे..’

‘मी डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा डॉक्टरांनी अस्ट्रासोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तेव्हा डॉक्टरांच्या डोळ्यांमध्ये मला भीती दिसत होती. डॉक्टरांनी लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचं सांगितलं. मी डॉक्टरांना विचारं माझी प्रकृती स्थिर होईल ना? डॉक्टरांनी मला दिलासा देखील दिला आणि सगंळ ठिक होईल असा विश्वास दाखवला..’

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांनी सांगितलेले पर्याय

परचुरे म्हणाले, ‘सुरुवातील उपचारचं चुकीचे झाले. चुकीच्या उपचारांमुळे माझी प्रकृती आणखी बिघडली होती. चालताही येत नव्हतं. पुढे डॉक्टरांनी काही महिने थांबण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सांगितलं सर्जरी केली की तुम्हाला कावीळ होईल तुम्ही जिवंत राहणार नाही… त्यामूळे काही दिवस थांबण्याचा पर्याय योग्य आहे असं ठरवलं. डॉक्टरांचे आणखी दोन तीन सल्ले घेतले आणि आयुष्य बदलंलं..’

सांगायचं झालं तर, अतुल परचुरे यांना जेव्हा कॅन्सरचं निदान झालं तेव्हा त्यांना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मोना हिच्या वडिलांच्या भूमिकेसाठी बोलावलं होतं. पण आजारामुळे त्यांना जाता आलं नाही. कॅन्सरवर मात केल्यानंतर निधन झाल्यामुळे अतुल परचुरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहे. असं म्हणायला देखील हरकत नाही.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.