स्टार प्रवाहवरील मालिकांमधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच आता पडद्यामागे देखील कलाकारांची धमाल अविरतपणे सुरू आहे.
आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेनं 300 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.
यानिमित्त ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या सेटवर सेलीब्रेशन पार पडलंय. संपूर्ण टीमनं केक कट करत धमाल केली आहे.
कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
मालिका आणि मालिकेतील कलाकारांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.