‘आधी वाटलं स्वतःला मारून टाकावं, पण…’, अवधूत गुप्ते असं का म्हणाला?
avdhoot gupte : अवधूत गुप्ते याची सोशल मीडिया पोस्ट तुफान चर्चेत, 'तो' व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, 'आधी स्वतःला मारुन टाकावं वाटलं, पण...', सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त अवधूत गुप्ते याच्या पोस्टची चर्चा
मुंबई | 13 जानेवारी 2024 : ‘ऐका दाजीबा’, ‘हळू हळू चाल’, ‘राणी माझ्या मळ्यामंदी…’, ‘खंडाळा घाट’, ‘नाद करायचा नाय’ यांसारखी अनेक गाणी गायक अवधूत गुप्ते याने मराठी सिनेविश्वाला दिली आहे. अवधूत गुप्ते इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक, संगीतकार, सिनेमा निर्माता, दिग्दर्शक आहे. अवधूत याने गायिलेली अनेक गाणी हीट देखील झाली आहेत. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणार अवधूत गुप्ते आता त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवधूत गुप्ते याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
अवधूत गुप्ते याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या नव्या गाण्याची अपडेट चाहत्यांना दिली आहे. अवधूत याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. ‘प्रीय जान.. जानू .. जानेश्वरी.. तू सोडून गेल्यावर खूप रडलो.. पडलो .. धडपडलो.. आधी वाटलं स्वतःला मारून टाकावं .. पण नंतर वाटलं की तू जशी ‘मारून‘ गेलीस.. त्या नंतर स्वतः च स्वतःला काय मारायचं? लवचा खंजीर छातीत घुसला की कुणाचं रक्त निघतं आणि कुणाची गाणी!
View this post on Instagram
पोस्टमध्ये पुढे अवधूत म्हणतो, ‘ही बघ माझी गाणी.. एक अल्बम , चार गाणी… प्रत्येक गाणं.. एका तुटलेल्या हार्टची कहाणी! इशय हार्ड हाय.. कारन इशय ‘हार्ट‘ हाय! बग.. माझी आठवण येते का..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवधूत गुप्ते याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. अवधूत याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सांगायचं झालं तर, अवधूत याने नव्या गाण्यासाठी ही पोस्ट लिहीली आहे. ‘विश्वमित्र’ असं अवधूत याच्या नव्या गाण्याच्या अल्बमचं नाव आहे.. अवधूत कायम त्याच्या नव्या गाण्यांचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतो. अवधूत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अवधूत याने आतापर्यंत राजकीय पक्षांचे टायटल साँग देखील लिहीले आहेत. आता चाहत्यांमध्ये गायकाच्या नव्या गाण्यांची उत्सुकता आहे.