Avatar 2: ‘अवतार 2’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात; थिएटरमध्ये 24 तास चालणार शोज

तब्बल 25 दिवस आधीपासूनच 'अवतार 2'च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात; मध्यरात्री असेल पहिला शो

Avatar 2: 'अवतार 2'च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात; थिएटरमध्ये 24 तास चालणार शोज
Avatar: the way of waterImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 1:45 PM

मुंबई: जेम्स कॅमरून यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. देशातल्या काही शहरांमध्ये या चित्रपटाचे शोज 24 तास चालणार आहेत. पहिला शो 16 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या चित्रपटाची इतकी जोरदार चर्चा आहे की प्रदर्शनाच्या 25 दिवस आधीपासूनच ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

अफाट बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट स्पेशल इफेक्ट्स, VFX आणि बॅकग्राऊंड स्कोरसाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करणार, असा अंदाज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.

अवतार फ्रँचाइजीमधला पहिला चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले होते. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 19 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर-

या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 14 वर्षे झाली असली तरी कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही अग्रस्थानी आहे. त्याचा विक्रम कोणताच चित्रपट अद्याप मोडू शकला नाही. यामध्ये सॅम वॉशिंग्टन, जोई सल्डाना, स्टीफन लँग यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

अवतार 2 मध्ये काही नवीन कलाकारांचीही एण्ट्री झाली आहे. यामध्ये टायटॅनिक फेम केट विंसलेट आणि क्लिफ कर्टिस यांचाही समावेश आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.