असा नवरा सर्वांना मिळो! सुबकदार अन् खुसखुशीत करंज्या; अभिनेत्याने बनवला दिवाळी फराळ, नेटकऱ्यांनी केलं कौतुक
दिवाळीच्या निमित्ताने अभिनेते अविनाश नारकर यांनी स्वतःहून दिवाळीचा फराळ, विशेषतः करंज्या बनवल्या. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. ऐश्वर्या यांनीही त्यांच्या पतीच्या स्वयंपाकाचे कौतुक केले.
दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच घरी जोरदार तयारी सुरु आहे. कंदील, दिवे, लाईटींग इथपासून ते दिवाळी फराळापर्यंत सर्वांच्याच घरी लगबग सुरु आहे. यात सर्वांत जास्त पुढाकार हा महिलांचा असतो.पण ज्या महिला नोकरी करतात त्यांची मात्र तारेवरची कसरत महिलांना करावीच लागते. अशीच काहीशी परिस्थिती कलाकारांकडेही असते. काही कलाकार कामात व्यस्त असल्याने त्यांचीही धावाधावही होतेच. पण एका अभिनेत्याने कामात व्यस्त असलेल्या पत्नीची मदत करतं तिचा फराळाचा भार हलका केला आहे.
फराळ बनवून पत्नीला सरप्राईज
ज्याने दिवाळीचा फराळ बनवून आपल्या पत्नीला सरप्राईज केलं आहे ते आहेत अभिनेते अविनाश नारकर. पत्नी ऐश्वर्या नारकर सध्या शुटिंगलमध्ये व्यस्त आहेत. मालिकेच्या शुटिंगमुळे त्यांना कुटुंबासोबत दिवाळीची तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाहीये. यामुळे त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांनी यंदा दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच संदर्भातला एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इंस्ट्राग्राम पेजवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी स्वत:हा करंजाचे सारण बनवलेले दिसत आहे तसेच त्यांनी सुबक अशा करंज्या बनवून त्या खुसखुशीत तळल्यासु्द्धा आहेत.
अविनाश नारकरांनी करंज्या बनवतानाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘चला चला, या या या… सगळ्यांनी फराळाला या… मी,ऐश्वर्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या मंगलमय, तेजोमय दिवाळी आणि नवीन वर्षांच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा!’ अविनाश यांच्या या व्हिडीओचे सर्वांनी गोड कौतुकही केले आहे.
पत्नीची पतिच्या फराळावर कमेंट
दरम्यान, या व्हिडीओ शेअर केल्यावर आता ऐश्वर्या नारकर काय कमेंट करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओवर “कमाल करंज्या…” अशी कमेंट केली आहे.
नेचकऱ्यांनी केलं अविनाश यांचे कौतुक अविनाश यांनी करंज्या बनवतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचे तोंडभरू कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे ‘तुमच्या सारखा गोड साथीदार मिळाला, तर करंज्या काय संसार पण गोडच होणार, अविनाश आणि ऐश्वर्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!’ आणखी एकाने लिहिलंय, ‘वाह… सर आम्ही करंज्या खायला नक्कीच येतो, शुभ दिपावली’, तर एकाने लिहिलं आहे “असा नवरा सर्वांना मिळो”.तर अशा पद्धतीने या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram