Avneet Kaur : मुंबईत घर, महागड्या गाड्या, 22 वर्षीय अवनीत कौरची थक्क करणारी संपत्ती

अवनीत कौर अवघ्या 22 व्या वर्षी सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. वयाच्या 22 व्या वर्षी अवनीतची एकूण संपत्ती जवळपास 7 कोटी रुपयांच्या घरात आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 32 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Avneet Kaur : मुंबईत घर, महागड्या गाड्या, 22 वर्षीय अवनीत कौरची थक्क करणारी संपत्ती
Avneet KaurImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 4:10 PM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री अवनित कौर सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिचे तीन कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. गेल्या काही दिवसांपासून अवनीत तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळेही चर्चेत आहे. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी अवनीतचं कुटुंब जालंधरहून मुंबईला आलं होतं. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच तिने तिचं करिअर निश्चित केलं होतं.

अवनीतने वयाच्या आठव्या वर्षापासूनच विविध डान्स शोजमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. यासोबतच तिने तिचं शालेय शिक्षणसुद्धा सुरू ठेवलं होतं. मुंबईतल्या एका खासगी कॉलेजमधून तिने कॉमर्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. अवनीत ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ आणि ‘डान्स के सुपरस्टार्स’ यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. आपल्या दमदार परफॉर्मन्सने तिने परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

हे सुद्धा वाचा

अवनीतने 2012 मध्ये छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘मेरी माँ’ या मालिकेतून तिने पदार्पण केलं होतं. मात्र तिला खरी ओळख ‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेतून मिळाली. याशिवाय टिक-टॉकवरही तिचा मोठा चाहतावर्ग होता. खऱ्या आयुष्यात अवनीत फारंच आलिशान आयुष्य जगते.

View this post on Instagram

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

अवनीतची एकूण संपत्ती ही जवळपास 7 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. तिच्या कमाईतील मोठा भाग हा जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे येतो. दर महिन्याला ती जाहिराती आणि प्रमोशनल पोस्टद्वारे जवळपास 8 लाख रुपये कमावते. याशिवाय म्युझिक व्हिडीओ, टीव्ही आणि चित्रपटांमधूनही तिची जवळपास कोटी रुपयांची कमाई होते.

अवनीतचं मुंबई हक्काचं घरसुद्धा आहे. हे घर तिने नुकतंच विकत घेतलं आहे. अवनीत तिच्या आई-वडिलांसोबत राहते. तिला महागड्या आणि आलिशान गाड्यांचीही आवड आहे. तिच्याकडे 80 लाख रुपयांची रेंज रोव्हर, हुंडाई क्रेटा, स्कोडाची कोडियाक आणि टोयाटाची फॉर्च्युनर एसयूव्ही यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.