अवनीत कौर अडकणार विवाहबंधनात, कोण आहे नवरा मुलगा? म्हणाली, ‘आई – वडिलांच्या परवानगीनंतर’

Avneet Kaur : अवनीत कौर 22 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात, कोण आहे नवरा मुलगा? गेल्या तीन वर्षांपासून 'या' व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा, अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत कौर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

अवनीत कौर अडकणार विवाहबंधनात, कोण आहे नवरा मुलगा? म्हणाली, 'आई - वडिलांच्या परवानगीनंतर'
Avneet Kaur
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 11:52 AM

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) फक्त अभिनेत्री नाही तर, सोशल मीडिया स्टार देखील आहे. अवनीत तिच्या फॅशन सेन्समुळे देखील कायम चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड अदा आणि अन्य कोणत्या कारणामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अवनीत लग्नाबद्दल म्हणाली, ‘कायम मला लग्नाबद्दल विचारलं जातं. मला नाही माहिती चाहते माझ्या लग्नाबद्दल का चिंतेत आहेत? मी तुम्हाला सांगते माझ्या लग्नाला फार वेळ आहे. त्यामुळे शांत राहा आणि प्रतीक्षा करा…’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला लव्ह मॅरिजवर विश्वास आहे. पण लव्ह मॅरिजसाठी आई – वडिलांकडून आशीर्वाद मिळाले तर, अरेंज आणि लव्ह दोन्ही मॅरिज करेल… मला असंच लग्न करायचं आहे आणि नाही झालं तर, एका कोपऱ्यात बसून मी एकटी रडेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अवनीत हिचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये अवनीत चाहत्यांना आंगठी दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसली. ज्यामुळे अवनीत हिने कोणालाही न सांगता साखरपुडा केल्याच्या चर्चांनी जोर धरला.

फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, ‘चांगल्या गोष्टी घडण्यासाठी उशीर लागतो… या युनियनबद्दल आणि पुढे काय होणार आहे हे जगाला सांगण्याची प्रतीक्षा मी आता करू शकत नाही…’ असं लिहिलं होतं. त्यामुळे अवनीत हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

कोण आहे मुलगा?

अवनीत कौर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव राघव शर्मा याच्यासोबत जोडलं जात आहे. दोघे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत अशी देखील चर्चा आहे. अनेक ठिकाणी अवनीत – राघव यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील अवनीत कायम सक्रिय असते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.