शाहिद कपूर – करीना कपूरची Awkward मूमेंट; एकमेकांसमोर आले अन्.., पहा व्हिडीओ
शाहिद कपूर आणि करीना कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतली सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचं ब्रेकअप झालं तरी आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात हे दोघं एकमेकांसमोर आले होते. तेव्हा करीनाने थेट शाहिदकडे दुर्लक्ष करणं पसंत केलं.
मुंबई : 21 फेब्रुवारी 2024 | मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा (DPIFF) पार पडला. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या दोन कलाकारांची अशाप्रकारे नजरानजर झाली, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. कारण एकेकाळी हे दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा हा व्हिडीओ आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील ही एकेकाळची अत्यंत प्रसिद्ध जोडी होती. ब्रेकअपनंतरही अनेकदा हे दोघं चर्चेत आले होते.
‘जब वी मेट’, ‘उडता पंजाब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारणारे शाहिद कपूर आणि करीना कपूर यांना जेव्हा कधी कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलं, तेव्हा ते एकमेकांसमोर नम्रपणे वागताना दिसले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर जेव्हा एक्स कपल एकमेकांसमोर येतात, तेव्हा तो क्षण दोघांसाठीही संकोचलेपणाचा असतो. असंच काहीसं या पुरस्कार सोहळ्यात पहायला मिळालं. शाहिद त्याच्या हातात ट्रॉफी घेऊन रेड कार्पेटवर उभा होता. त्याच्यासोबत आणखी दोघं जण होते. त्याचवेळी करीना त्याच्यासमोरून जाते आणि शाहिदसोबत उभ्या असलेल्या एका व्यक्तीला हसून अभिवादन करते. यावेळी शाहिदचीही नजर करीनाकडे वळते. शाहिदसमोर न थांबता करीना पुढे निघून जाते आणि पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देते.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
शाहिद कपूर आणि करीना कपूरची जोडी ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. हे दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. शाहिद आणि करीनाच्या अफेअरने बी-टाऊन आणि चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. पहिल्याच भेटीत करीनाला शाहिद आवडला होता. या भेटीनंतर लगेचच दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. खुद्द करीनाने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की तिने शाहिदला अनेकदा मेसेज आणि फोन केले होते. त्यानंतर त्याने तिच्या प्रपोजलचा स्वीकार केला होता. 2006 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. तर शाहिद आणि मीरा कपूर यांनी लग्नगाठ बांधली. करीनाला तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर शाहिद-मीराला मिशा आणि झैद ही दोन मुलं आहेत.