मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये अनेक मोठे खुलासे होत आहेत. आता बिग बॉस 17 च्या घरात फॅमिली वीक सुरू झालाय. यामुळे प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन हे होताना दिसत आहे. बिग बॉस 17 चा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये आयशा खान ही मुनव्वर फारुकी याच्यावर गंभीर आरोप करताना दिसतंय. मुनव्वर फारुकी आणि आयशा खान यांच्यामध्ये मोठे वाद सुरूवातीपासूनच बघायला मिळत आहेत. मुनव्वर फारुकी हा आयशा खान हिला डेट करत होता.
काही दिवसांपूर्वीच आयशा खान हिने सांगितले की, मुनव्वर फारुकी याने तिला मोठा धोका दिलाय. ज्यावेळी मुनव्वर फारुकी हा आयशा हिला डेट करत होता त्यावेळीच तो दुसऱ्या एका मुलीला देखील डेट करत होता. यासोबतच तिने अजूनही काही गंभीर आरोप हे मुनव्वर फारुकी याच्यावर लागावले. ज्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.
व्हायरस होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आयशा खान ही म्हणते की, हा बाहेर एका मुलीला प्रपोज पाठवून आलाय आणि दुसऱ्या मुलीला…इथे आता तो पर्सनल कारणांबद्दल बोलत आहे…मी याचे सर्व सत्य नक्कीच बाहेर आणणार आहे. त्यानंतर तिथे लगेचच मुनव्वर फारुकी हा पोहचला. मुनव्वर फारुकी म्हणतो की, मी काय पर्सनल कारण वापरले?
Promo ⚡️
Ayesha Vs Munawar
Munawar Sister enters in the house.#BiggBoss #BiggBoss17 #BB17 #AyezaKhan #MunawaraFaruqui #AnkitaLokahnde pic.twitter.com/VuVsZFF12g— Bigg Boss Observer (@BigBossObserver) January 9, 2024
पुढे आयशा खान ही म्हणते की, मी जर सर्वकाही सांगायला बसेल ना तर मग…पुढे आयशा ही म्हणते की, तू आता काही बोलणार नाहीस कारण तुला माहितीये की, आणखी काही गोष्टी बाहेर येतील. आता आयशा खान ही मुनव्वर फारुकी याची पोलखोल करणार असल्याचे स्पष्ट दिसतंय. मुनव्वर फारुकी हा नेमक्या कोणत्या मुलीला प्रपोज करून आलाय याची चर्चा रंगत आहे.
काही दिवसांपूर्वीच मुनव्वर फारुकी याने आयशा खान हिची माफी मागितली. कारण मुनव्वर फारुकी हा आयशा हिला डेट करत होता, त्यावेळीच तो अजून एका मुलीला डेट करत होता. आता अजून एक गंभीर आरोप हा आयशा खान हिने मुनव्वर फारुकी याच्यावर केलाय. आता या दोघांमधील वाद वाढण्याची दाट शक्यता नक्कीच दिसत आहे.