“माझ्याकडे पाहून म्हणाले,तू सुंदर नाहीयेस”; बड्या प्रोडक्शन हाऊसकडून अपमान ते आज नावाजलेल्या मालिकेची ‘ती’ नायिका

आयशा सिंह या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या संघर्षाच्या प्रवासात एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून अपमान आणि नकार अनुभवला. "तू सुंदर नाहीयेस" असा शब्द ऐकल्यानंतर तिला खूप वाईट वाटले होते आणि ती मुंबई सोडण्याचा विचार करत होती. पण तिने धीर सोडला नाही आणि अनेक जाहिराती आणि मालिका करून ती "गुम है किसी के प्यार में" या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

| Updated on: Oct 27, 2024 | 6:57 PM
 मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीत किंवा मालिकांमध्ये आपलं नशीब आजमवायला अनेक मुले-मुली अगदी मोठ्या शहरांपासून ते छोट्या छोट्या गावांमधून येतात. त्यातील काही यशस्वी होतात तर काही काहींना रिकाम्या हाताने परतावं लागतं किंवा दुसऱ्या कोणत्यातरी क्षेत्रात हातपाय मारावे लागतात. पण बॉलीवूड असो किंवा टीव्हीचं जग कोणत्याही मुला-मुलीला घ्यायचं म्हटलं तर टॅलेंट पाहिलं जातं  पण त्याहीआधी पाहिलं जातं ते त्यांचा रंग ,रुप, उंची, भाषा अशा अनेक गोष्टींवर ठरतं त्यांची निवड की रिजेक्शन.

1 / 6
पण काहीवेळेला ऑडिशनला आलेल्या या नवीन मुला-मुलींना रिजेक्शनसोबतच अपमानालाही बऱ्याचदा सामोरं जावं लागतं. सगळेच तो अपमान पचवू शकतात असं नाही. असाच एक अनुभव आला होता एका अभिनेत्रीला.

2 / 6
 प्रसिद्ध अभिनेत्री आयशा सिंग हिच्यासोबत असंच काहीसं घडलं. 'गुम हैं किसी के प्यार में' या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेल्या आणि घराघरात पोहोचलेल्या आयशाला तिच्या संघर्षाच्या काळात मात्र बऱ्याच गोष्टींना सामोर जावं लागलं होतं, तिलाही  अपमान आणि रिजेक्शनला सामोर जावं लागलं होतं.

3 / 6
 सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये दरम्यान आयशाने तिच्या सोबत घडलेला किस्साही शेअर केला आहे, ती म्हणाली की," मी एका खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये गेले होते. माझ्याकडे बघून ते लोक म्हणाले की, 'तू सुंदर नाही आणि खूप मेकअप कर. नंतर आपण बोलू' तो मला मिळालेला पहिला नकार होता आणि ही माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं.'

4 / 6
सतत येत असलेल्या रिजेक्शनमुळे मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता.पुढे ती म्हणाली,''सुरुवातीला मी नशीबवान होते की मला काही जाहिराती मिळाल्या. पण मला जे करायचं होतं त्यासाठी मला बराच वेळ वाट पहावी लागली. जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा कुठे ऑडिशन्स होतात आणि कुठे जायचं हे तुम्हाला माहीत नसतं. या काळात बराच वेळ वाया जातो. असं नाही की तुम्ही कोणत्याही स्टुडिओ किंवा प्रॉडक्शन हाऊसमध्ये गेलात की तुम्हाला लगेच काम मिळतं. पण मला पहिला शो 'दिल्ली अरमानो की' मिळाला आणि त्यानंतर लगेचच दुसरा शोसुद्धा मिळाला."

5 / 6
दरम्यान आयशाने क्रिमिनल आणि सिव्हिल जस्टिसमध्ये कायद्याची पदवी घेतली आहे.  मात्र आयशाला अभिनयात जास्त रस असल्याचे तिने सांगितले. ती तिच्या शालेय जीवनापासून अभिनय करण्याचा प्रयत्न करत होती.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.