ट्रेनमध्ये गाणं गायचा ‘हा’ अभिनेता, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक
Bollywood Actor Life: नशीब कधी चमकतील सांगता येत नाही..., कधी काळी ट्रेनमध्ये गाणं गाणारा अभिनेता, आज आहे कोट्यवधींचा मालक, आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्याचं अव्वल स्थानी नाव...
झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं. अशा सेलिब्रिटींना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना… आज आयुष्मान खुराना याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आयुष्यान याने आतापर्यंत ‘विक्की डोनर’, ‘बधाई हो’, आणि ‘दम लगाके हईशा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे, सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी आयुष्मान ट्रेनमध्ये गाणं गायचा…
आज आयुष्मान याचा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ. आयुष्मान याला लहानपणापासून अभिनय आणि गाण्यामध्ये आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश घेताच आयुष्मान याने अनेक गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर, त्या काळात अभिनेता दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये मित्रांसोबत गाणीही म्हणायचा.
View this post on Instagram
याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत केला होता. ‘आमच्याकडे फार कमी पैसे असायचे. पण आम्ही खूप मज्जा केली आहे. आम्ही कधी ट्रेनमध्ये असायचो तर, गाणं म्हणायला सुरुवात करायचो. यासाठी लोकं आम्हाला पैसे देखील द्यायचे. एकदा तर माझं गाणं लोकांना इतकं आवडलं की त्यांनी आम्हाला खूप पैसे दिले. त्या पैशांमध्ये आम्ही गोवा फिरुन आलो.’
कॉलेजचे दिवस संपल्यानंतर आयुष्मानच्या आयुष्यातील खरा प्रवास सुरु झाला. करियरसाठी आयुष्मान मायानगरी मुंबईत आला आणि त्याच्या आयुष्यातील संघर्ष सुरु झाला. अनेकदा नकार पचवल्यानंतर एमटीव्ही वरील ‘रोडीज’ शोमध्ये काम करण्याची संधी आयुष्मान याला मिळाली आणि ‘रोडीज’ शोची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
View this post on Instagram
आयुष्मानच्या करिअरला सुरुवात झाली आणि तो एमटीव्हीसाठी व्हिडिओ जॉकी म्हणून काम करू लागला. त्यानंतर इथून अभिनेत्याला ‘विकी डोनर’ हा पहिला सिनेमा मिळाला आणि सिनेमा देखील सुपरहिट ठरला. आज आयुष्मान खुरानाने आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची संपत्ती मिळवली आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 80 कोटी रुपये आहे.