Ayushmann Khurrana | वडिलांच्या अंत्यविधीदरम्यान आयुषमान खुरानाला ‘ही’ चूक पडली महागात, तुफान ट्रोलिंग

आयुषमानचे वडील पंडित पी. खुराना हे ज्योतिष क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते. त्यांनी ज्योतिषशास्त्राशी संबंधित अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. ज्योतिषाच्या क्षेत्रातील या ज्ञानामुळे त्यांना खूप मानसन्मान मिळाला होता.

Ayushmann Khurrana | वडिलांच्या अंत्यविधीदरम्यान आयुषमान खुरानाला 'ही' चूक पडली महागात, तुफान ट्रोलिंग
Ayushmann KhurranaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 11:29 AM

मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील पी. खुराना यांचं शुक्रवारी निधन झालं. पी. खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मोहाली इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सध्या आयुषमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयुषमान त्याच्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देताना आणि अंत्यविधी पार पाडताना दिसत आहे. मात्र त्यातील एका चुकीमुळे नेटकऱ्यांकडून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

आयुषमानचे वडील पंडित पी. खुराना हे ज्योतिष क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते. त्यांनी ज्योतिषशास्त्राशी संबंधित अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. ज्योतिषाच्या क्षेत्रातील या ज्ञानामुळे त्यांना खूप मानसन्मान मिळाला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा वारसा शिल्पा धर यांच्याकडे सोपविला. शिल्पाने सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये आयुषमान खुराना गॉगल लावल्याचं पहायला मिळत आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी त्याला खडेबोल सुनावले आहेत. ‘वडिलांच्या निधनानंतरही गॉगल घालणं गरजेचं आहे का’, असा सवाल एकाने केला. तर ‘इथेसुद्धा हिरोगिरीच सुरू आहे. अशा वेळी तरी गॉगल काढायला पाहिजे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

पहा व्हिडीओ

सेलिब्रिटींना अशा प्रकारे ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी अभिनेता उदय चोप्रालाही अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आलं होतं. आई पामेला चोप्रा यांच्या निधनानंतर कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी त्याच्या घरी पोहोचले होते. यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेता आमिर खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव उदयची गळाभेट घेताना दिसत होते. यावेळी उदय हसत हसत त्यांची भेट घेतो. हेच पाहून नेटकरी भडकले होते.

‘आईच्या निधनानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. थोडीतरी लाज बाळगली पाहिजे’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘आईच्या निधनावर असणारी ही अशी कशी व्यक्ती आहे. असे हसून गळाभेट घेत आहेत, जसं की रिसेप्शन पार्टी चालू असेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.