मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आयुष्मान गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भागाच्या दौरावर अनुभव सिन्हासोबत होता. आजच आयुष्मानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव देखील पुढं आले आहे. हा चित्रपट अनुभव सिन्हा निर्मित असून चित्रपटाचे नाव ‘अनेक’ (Anek) असे आहे. आयुष्मानने 2 फोटो शेअर केले आहेत. (Ayushmann Khurrana will be seen in the movie Anek)
त्यामध्ये आयुष्मानचा लूकही थोडा वेगळा दिसत आहे. एका फोटोमध्ये अनुभव सिन्हा आणि आयुष्मान खुराना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये आयुष्मान जीपमध्ये बसलेला दिसत आहे. हे फोटो शेअर करताना आयुष्मानने लिहिले की, अनुभव सिन्हा सर यांच्याशी पुन्हा एकत्र काम करण्यास मी खूप उत्साही आहे. हा चित्रपट अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार निर्मित आहे.
आयुष्मानचे चंडीगढ़ करे आशिकी आणि डॉक्टर जी हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटाचं चित्रीकरण कोरोना काळात सुरू झालं होतं आणि आता हे चित्रीकरण संपलं आहे. या चित्रपटाचं दोन महिन्यांपूर्वी चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. ‘चंदीगड करे आशिकी’च्या चित्रीकरणानंतर वाणी कपूरनं फोटो शेअर केले होते.
‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमनं धमाल पार्टी केली होती. वाणीनं पार्टीचे काही फोटो शेअर केले होते, या फोटोमध्ये वाणी, आयुष्मान आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर केक कापताना दिसत होते. वाणीनं ‘या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं आहे.
संबंधित बातम्या :
अनुराग कश्यपच्या लेकीने शेअर केला हॉट फोटो, ‘सोशल मीडियावर जाळ अन् धुर संगटच….!’
Video | रितेशसोबत नाचताना खाली पडली जेनेलिया, अभिनेत्याने शेअर केला गमतीदार व्हिडीओ!
कुणाच्याही वाट्याला असे दिवस येऊ नयेत, लग्न झाल्यानंतर या 5 अभिनेत्रींनी नरक यातना सोसल्या…!
(Ayushmann Khurrana will be seen in the movie Anek)