Sourav Ganguly याच्या बायोपिकमध्ये दिसणार ‘हा’ अभिनेता; मोठी अपडेट समोर

Sourav Ganguly | सौरव गांगुली याच्या बायोपिकच्या प्रतीक्षेत चाहते; 'हा' अभिनेता दिसणार क्रिकेटपटूच्या भूमिकेत... सध्या सर्वत्र सौरव गांगुली याच्या बायोपिकचीच चर्चा...

Sourav Ganguly याच्या बायोपिकमध्ये दिसणार 'हा' अभिनेता; मोठी अपडेट समोर
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने वर्ल्ड कपमध्ये 25 सिक्स मारले आहेत. क्रिकेट जगतात दादा म्हणून ओळखला जाणारा गांगुली आपल्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असायचा.
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 11:21 AM

मुंबई : 5 सप्टेंबर 2023 | आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींचं आयुष्य बायोपिकच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आलं. अनेक क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर देखील सिनेमा साकारण्यात आला. भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी(Mahendra Singh Dhoni) याच्या आयुष्यावर देखील सिनेमा साकारण्यात आला. सिनेमात अभिनेता सुशांत सिंह राजपूत(Sushant Singh Rajput) याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल देखील मारली. एवढंच नाही तर, सिनेमातील गाणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. आता माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची बायोपिक चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सौरव गांगुली याची चर्चा रंगत आहे.

सौरव गांगुली याच्या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल असं सांगण्यात आलं होतं. पण आता सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. सिनेमात अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सतत कार्यक्रमात दिसत आहे. नुकताच अभिनेत्याने सौरव गांगुली याच्या बायोपिकबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सध्या याबद्दल काहीही सांगू शकत नाही. योग्य वेळी अधिकृत घोषणा करावी लागेल…’ असं अभिनेता म्हणाला..

सांगायचं झालं तर, सौरव गांगुली याच्या बायोपिक संबंधी आयुष्मान खुराना दोन दिग्दर्शकांना भेटला आहे. दिग्दर्शक अंकुर गर्ग आणि लव्ह रंजन यांच्या घरी बयोपिकसंबंधी बैठक झाली आहे. सिनेमाची स्क्रिप्ट देखील तयार असल्याची माहिती मिळत आहे. पण सिनेमाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या सर्वत्र आयुष्मान खुराना यची चर्चा आहे.

खेळाडूंवर साकारण्यात आले सिनेमे

सौरव गांगुली याच्यावर बायोपिक साकारण्यापूर्वी एम एस धोनी, मिल्खा सिंह, महावीर सिंह फोगाट, मॅरी कॉम, कपिल देव यांच्या आयुष्यावर सिनेमा साकराण्यात आला आहे. आता अभिनेत्री अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार झूलन गोस्वामी हिच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची शुटिंग पूर्ण झाल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या सर्वत्र बायोपिकची चर्चा रंगत आहे. चाहते देखील सौरव गांगुली याच्या  बायोपिकच्या प्रतीक्षेत आहेत. पण सिनेमाबद्दल अद्याप काहीही अधिकृत सांगण्यात आलेलं नाही.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.