‘तेव्हा आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, पण…’, अभिषेक बच्चन याने सांगितला ‘तो’ किस्सा

Abhishek Bachchan : 20 वर्षांपूर्वी कशी होती बच्चन कुटुंबाची परिस्थिती, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी देखील नव्हते पैसे? अभिषेक बच्चन याने सांगितला 'तो' किस्सा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याची चर्चा...

'तेव्हा आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, पण...', अभिषेक बच्चन याने सांगितला 'तो' किस्सा
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 1:46 PM

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन याने नुकताच झालेल्या मुलाखतीत आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी अभिषेक याला एका पुरस्कार सोहळ्यात पाहिले आणि अभिनेत्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. पण त्याआधी अभिषेक तब्बल 2 वर्ष याच प्रतीक्षेत होता, की त्याला कोणी सिनेमात कास्ट करेल. एवढंच नाहीतर, अभिषेक याने वडील अमिताभ बच्चन यांच्या संघर्षाबद्दलही सांगितलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगील आहे.

अभिषेक म्हणाला, ‘मला कायम प्रसिद्ध अभिनेता व्हायचं होतं. म्हणून मी अनेक दिग्दर्शकांकडे देखील गेलो. पण अमिताभ बच्चन यांचा मुलगा आसल्यामुळे मला कोणताच दिग्दर्शक कास्ट करण्यासाठी तयार नव्हता. अखेर मी आणि माझ्या मित्राने मिळून स्क्रिप्ट लिहिण्याची सुरुवात केली. पण ती स्क्रिप्ट देखील पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर एकदा वडिलांसोबत फिल्मफेअर अवॉर्डसाठी गेलो आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.’

’20 वर्षापूर्वी फिल्मफेअर अवॉर्डसाठी कोणते कपडे घालायचे हे एक महिन्याआधी ठरलेलं असायचं. तेव्हा कोणी रेंट किंवा मेफत कपडे देत नव्हतं. म्हणून कपडे विकतच घ्यावे लागायचे. फिल्मफेअर अवॉर्डच्या संध्याकाळी कोणीच शुटिंग करायचं नाही. पूर्ण इंडस्ट्री फिल्मफेअर अवॉर्डसाठी उपस्थित असायची..’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेता म्हणाला, ‘एकदा वडील मला म्हणाले, फिल्मफेअर अवॉर्डसाठी तू सुद्धा माझ्यासोबत चल… पण तेव्हा इतके पैसे नव्हते, की नवीन कपडे खरेदी करता येतील… आता मी जे काही बोलत आहे, त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण तेव्हा महागडे कपडे खरेदी करणं आम्हाला परवडणारं नव्हातं… तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. पण लोकांना आमची परिस्थिती दिसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो.’

‘ फिल्मफेअर अवॉर्डसाठी काय घालू. माझ्याकडे फॉर्मल नव्हते. टी-शर्ट मला आवडत नव्हते. म्हणून फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मी बहिणीच्या लग्नातील शेरवानी घातली होती…पण त्याच फिल्मफेअर अवॉर्डनंतर माझा अभिनयाचा प्रवास सुरु झाला…’

अभिषेक बच्चन याला कसा मिळाला पहिला सिनेमा…

तेव्हा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये दिग्दर्शत जेपी दत्ता यांना ‘बॉर्डर’ सिनेमासाठी पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. अभिषेक म्हणाला, ‘पुरस्कार घेऊन येत असताना जेपी दत्ता यांनी मला पाहिलं आणि दोन दिवसांनंतर मला भेटण्यासाठी बोलावलं आणि मला सिनेमा ऑफर केला…’

अभिषेक याने 2000 मध्ये जेपी दत्ता यांच्या ‘रिफ्युजी’ सिनेमापटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री करीना कपूर हिने देखील ‘रिफ्युजी’ सिनेमापटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला, पण अभिषेक आणि करीना यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.