बच्चन फॅमिलीत वादळ आणणारा ऐश्वर्याचा ‘तो’ फोटो आणि किस सीन… हा किस्सा माहीत आहे काय?

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिच्या 'त्या' सीनमुळे बच्चन कुटुंबात वादळ तर आलं, पण भारतात देखील खळबळ माजली होती... कायद्याच्या कचाट्यात अडकली होती अभिनेत्री... वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर काय होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया? सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगली आहे.

बच्चन फॅमिलीत वादळ आणणारा ऐश्वर्याचा 'तो' फोटो आणि किस सीन... हा किस्सा माहीत आहे काय?
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 12:10 PM

मुंबई : 1 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या दोन वर्षांपासून अभिनय सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या हिने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एककाळ असा होता, जेव्हा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. 2016 मध्ये अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. इंटिमेट फोटोशूटमुळे ऐश्वर्या हिच्या खासगी आयुष्यात देखील खळबळ माजली होती. रिपोर्टनुसार, ऐश्वर्याच्या फोटोशूटमुळे बच्चन कुटुंबात वादळ आलं होतं.

2015 मध्ये दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात भूमिका साकारण्यासाठी तयार झाली होती. सिनेमात ऐश्वर्या हिचे तिच्यापेक्षा ९ वर्ष लहान अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत इंटिमेट सीन देखील होते. एवढंच नाही तर, सिनेमाच्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या आणि रणबीर यांनी इंटिमेट फोटोशूट देखील केलं होतं.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या हिचे रणबीर याच्यासोबत फोटो पाहिल्यानंतर बच्चन कुटुंबाने नाराजी व्यक्त केली होती. जया बच्चन – अमिताभ बच्चन यांनी सूनेच्या फोटोशूटवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली होती. तर चाहत्यांना देखील ऐश्वर्याने उचलेलं पाऊल आवडलेलं नाव्हतं.

दरम्यान, ‘धूम 2’ सिनेमात देखील ऐश्वर्या राय हिने अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत किसिंग सीन शूट केला होता. हा किसिंग सीन शूट करण्यात आला तेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला होता. हृतिक याच्यासोबत दिलेल्या किसिंग सीन दिल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. शिवाय कित्येक दिवस अभिषेक, हृतिक याच्यासोबत बोलत नव्हता..

‘धूम 2’ सिनेमातील किसिंग सीनमुळे ऐश्वर्या हिला अनेक धमक्या देण्यात आल्या होत्या. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस देखील बजावण्यात आली होती. ‘धूम 2’ सिनेमा प्रदर्शित तर झाला पण ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नानंतर देखील सर्वत्र खळबळ माजली होती.

यावर ऐश्वर्या हिने देखील स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी एक अभिनेत्री आहे आणि मी माझं काम करते. मला दोन किंवा तीन तासांच्या सिनेमावर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.’ सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.