आराध्या बच्चनच्या बदललेल्या लूकवर युजरकडून वाईट कमेंट, चाहते म्हणाले- गुन्हा दाखल करा
अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. या सोहळ्याला जगभरातून अनेक मोठी लोकं उपस्थित होती. उद्योगपतींपासून नेत्यांपर्यंत अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पण या दरम्यान ऐश्वर्याची मुलगी आराध्य बच्चन देखील तिच्या लूकमुळे चर्चेत आली.
जामनगर : 6 मार्च 2024 | अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनच्या मुलीच्या लूकची बरीच चर्चा होतेय. युजर्सला तिच्यात ऐश्वर्याची झलक दिसत आहे. नेहमी कॅज्युअल दिसणाऱ्या आराध्या बच्चन हिने या सोहळ्यात पांढरा-गुलाबी लेहेंगा घातला होता. अभिषेक-ऐश्वर्याची ही मुलगी खूपच क्यूट दिसत होती. सोशल मीडियावर एकीकडे आराध्याच्या नव्या लूकची चर्चा होत असतानाच तर दुसरीकडे काही लोकांनी फोटोवर वाईट कमेंट्स केले आहे. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांच्यावर POCSO कायदा लागू करण्याची मागणीही केली.
आराध्या खूपच सुंदर दिसतेय
ऐश्वर्याची मुलगी आराध्या तिच्या कुटुंबासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला आली होती. त्यानंतर तिचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ समोर आले. आराध्या या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. बदललेल्या हेअरस्टाईलने आराध्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. सोशल मीडियावर आराध्याच्या फोटोंवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. मात्र काही लोकं चुकीच्या कमेंट देखील करत आहेत.
आराध्या फक्त 12 वर्षांची आहे. अशा परिस्थितीत मुलींबद्दल असे लिहिणाऱ्यांवर पॉक्सो कायदा लागू करण्याची मागणी होत आहे. यावर बच्चन कुटुंबाने कारवाई करावी, असे लोक लिहित आहेत.
She is just a child. This post and all those who have replied in an absurd way need to be booked under POCSO Act.
This man @redflaghun needs to be arrested @Cyberdost @DelhiPolice @SrBachchan @juniorbachchan #TeamSAATH🤝 https://t.co/oyyrBhUZNa
— Team Saath Official🤝 (@TeamSaath) March 5, 2024
या पोस्टवर चुकीचे उत्तर देणाऱ्यांवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी युजर्स मागणी करत आहेत. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, दिल्ली पोलीस यांना त्यांनी टॅग केले आहे. काही लोक बच्चन कुटुंबाला टॅग करत आहेत आणि लिहित आहेत की बाहेरच्या लोकांना त्यांच्या मुलीची जास्त काळजी वाटते. त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाने हा सोहळा आयोजित केला होता. अंबानींच्या या कौटुंबिक सोहळ्याला जगभरातून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. बच्चन कुटुंबिय देखील या सोहळ्याला पोहोचले होते. अंबानी कुटुंबाकडून जगभरातील उद्योगपती, सेलिब्रिटी आणि नेत्यांना आमंत्रित केले आहेत. अनेक मोठी लोकं या सोहळ्याला आले होते.