पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यामुळे राम कपूर अडचणीत ; गौतमीने पतीला दिली कठोर शिक्षा
राम कपूर आणि गौतमी कपूर यांच्यात वाद? अभिनेत्याने पत्नीचा असा कोणता व्हिडीओ शेअर केला ज्यामुळे संतापली गौतमी... , अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
Ram Kapoor Wife Gautami Kapoor Video : ‘बडे अच्छे लगते हैं’ (Bade Achhe Lagte Hain) फेम अभिनेते राम कपूर कायम त्यांच्या खासगी आणि व्यवसायीक आयुष्यामुळे चर्चेत असतात. ज्याप्रमाणे राम कपूर ऑनस्क्रिन रोमान्ससाठी ओळखले जातात, त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात देखील राम कपूर तितकेच रोमांटिक आहेत. राम कपूर आणि पत्नी गौतमी कपूर (Gautami Kapoor) यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. पण आता दोघांमध्ये असं काय झालं ज्यामुळे गौतमीने पती राम कपूर यांना कठोर शिक्षा सुनावली आहे. सध्या राम कपूर आणि गौतमी कपूर यांचा एका व्हिडीओमुळे तुफान चर्चेत आले आहेत.
राम कपूर यांनी इन्स्टाग्रामवर पत्नी गौरी कपूर हिचा एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये गौतमी कपूर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमातील ‘क्यूटीपाय’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. गौतमीचा मजेदार व्हिडीओ शूट करुन राम कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फक्त व्हिडीओ शेअर केला नसून राम कपूर यांनी कॅप्शनमध्ये, ‘नौटंकी पाहा…’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
राम यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर गौतमीने मात्र संताप व्यक्त केला आहे. गौतमी राग आल्याचे इमोजी शेअर करत म्हणाली, ‘हा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे मी तुम्हाला ब्लॉक करणार आहे…’ सध्या गौतमीच्या भन्नाट डान्सची तुफान चर्चा रंगत आहे. दोघांमधील हे आनंदी वाद चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. राम कपूर आणि गौतमी कपूर कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
राम कपूर अभिनेत्री गौतमी गाडगीळ हे दोघेही टीव्हीचे लोकप्रिय कलाकार आहेत. जेव्हा एखाद्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसतात, तेव्हा प्रत्येकाची नजर त्यांच्यावर खिळलेली असते. सोशल मीडियावरही दोघेही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत दिसतात. दोघांच्या लग्न बरीच वर्षं झाली, पण आजही त्यांचं नातं नव्या कपलप्रमाणे आहे.
गौतमी देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. गौतमी, राम कपूर यांच्यासोबत ‘घर एक मंदिर’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. दोघांनी मालिकेत जवळपास दोन वर्ष काम केलं. त्यानंतर राम आणि गौतमी यांनी 2003 मध्ये लग्न केलं. राम आणि गौतमी यांचे लग्न व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी झालं. त्यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव अक्ष आहे तर, मुलीचं नाव सिया आहे.