‘ही’ अभिनेत्री 9 वर्ष लहान शुबमन गिल सोबत करणार लग्न? म्हणाली, ‘माझ्या वडिलांना कळल्यानंतर…’
Cricketer Shubman Gill | 'माझ्या वडिलांना कळल्यानंतर...', स्वतःपेक्षा 9 वर्ष लहान शुबमन गिल सोबत 'ही' करणार लग्न? नक्की काय आहे सत्य? गेल्या काही दिवसांपासून शुबमन गिल याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आता तर रंगणारी चर्चा लग्नापर्यंत पोहोचली आहे...
भारताचा स्टार क्रिकेटपटू शबमन गिल कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील शुबमन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी शुबमन आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेत्री रिद्धीमा पंडित हिच्यासोबत शुबमन याच्या लग्नाची चर्चा रंगली होती. यावर आता खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय रंगणाऱ्या चर्चांवर अभिनेत्रीच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती… यावर देखील रिद्धीमा हिने मौन सोडलं आहे.
‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धीमा म्हणाली, ‘कुटुंब फिल्म इंडस्ट्रीमधील असेल तर, त्यांना माहिती असतं की इंडस्ट्रीमध्ये अशा चर्चा कायम रंगलेल्या असतात. पण माझं कुटुंब फार साधं आहे. माझ्या कुटुंबातील फक्त मी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे…’
‘शुबमन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो उत्तम खेळाडू आहे. शिवाय तो तरुण देखील आहे. जेव्हा शुबमन याच्यासोबत लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या तेव्हा मला धक्का बसला. चर्चांना सर्वत्र उधाण आलं होतं. माझ्या बहिणीने मला फोन करुन विचारलं, तेव्हा मी दुर्लक्ष केलं. त्यानंतर माध्यमांचे मला फोन येऊ लागले. तेव्हा मी त्यांना सांगितलं कधी शुबमन याला भेटली देखील नाही… लग्न कसं होईल. जेव्हा मी लग्न करेल, तेव्हा स्वतः माझ्या लग्नाची घोषणा करेल…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लिंकअपच्या चर्चांपर्यंत ठिक आहे, पण थेट लग्नापर्यंत चर्चा रंगणं योग्य नाही. लोकांनी रंगणाऱ्या चर्चांवर विश्वास देखील ठेवला होता. माझ्या वडिलांपर्यंत चर्चा पोहोचल्या ते प्रचंड रागावले होते. अशा चर्चा कशा रंगतात? असा प्रश्न देखील त्यांना मला विचारला…’
ज्या सकाळी शुबमन – रिद्धीमा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या, त्याच्या आधी अभिनेत्री दुसऱ्या मुलासोबत डेटला गेली होती. ज्यामुळे अभिनेत्रीसाठी रंगणाऱ्या चर्चा अधिक धक्कादायक होत्या. पुढे कधी शुबमन याला भेटेल तेव्हा नक्की रंगलेल्या चर्चांवर त्याच्यासोबत हसेल… असं देखील अभिनेत्री म्हणाली…
रिद्धीमा पंडीत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बहू हमारी रजनीकांत’ ‘खतरा खतरा’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमध्ये देखील अभिनेत्री स्पर्धक म्हणून दिसली होती.
शुबमन गिल याचं खासगी आयुष्य
शुबमन गिल याचं प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील नातं जोडण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण कपिल शर्माच्या शोमध्ये सत्य सांगत सारा हिने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.