विवाहित पुरुषासोबत अभिनेत्रीचे ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अबॉर्शनसाठी मागितली मोठी रक्कम!

विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध, अबॉर्शन आणि बरंच काही..., प्रसिद्ध अभिनेत्री जेव्हा खासगी आयुष्यामुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात

विवाहित पुरुषासोबत अभिनेत्रीचे 'प्रेमसंबंध', गरोदर राहिल्यानंतर अबॉर्शनसाठी मागितली मोठी रक्कम!
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 11:39 AM

मुंबई | झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यात येणाऱ्या चढ – उतारांमुळे चर्चेत असतात. झगमगत्या विश्वात अभिनेत्रींनी स्वतःची भक्कम ओळख तर तयार केली, पण प्रेम प्रकरणांमुळे त्यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली. करियरच्या सुरुवातीला विवाहित पुरुषासोबत अफेअर, गरोदर राहिल्यानंतर अबॉर्शन… असा प्रसंग ‘बाहुबली’ फेम अभिनेत्रीच्या आयु्ष्यात आला होता. आयुष्यात आलेल्या या प्रसंगानंतर ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री राम्या कृष्णन (Ramya Krishnan) यांच्या अनेक चर्चा रंगल्या.

राम्या कृष्णन यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘बाहुबली’ सिनेमाच्या यशानंतर राम्या कृष्णन यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. झगमगत्या विश्वात काम करत असताना राम्या यांनी दिग्दर्शक के एस रवीकुमार यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं.

२००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘पंचतंत्र’ सिनेमात रवीकुमार यांनी अभिनेत्रीला एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आणलं. अनेक वर्ष एकमेकांसोबत कामाच्या निमित्ताने अधिक काळ घालवत असल्यामुळे राम्या आणि रवीकुमार यांच्यामध्ये प्रेम बहरंल. इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा रंगल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.

हे सुद्धा वाचा

राम्या आणि रवीकुमार यांच्या अफेअरबद्दल दिग्दर्शकाच्या पत्नीला देखील कळलं. तेव्हा दिग्दर्शकाच्या पत्नीने राम्या यांना चांगलंच खडसावलं. राम्या आणि रवीकुमार यांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्याची देखील चर्चा रंगली. याच काळत राम्या गरोदर राहिल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. गरोदर राहिल्यानंतर राम्या यांनी रवीकुमार यांच्याकडून अबॉर्शनसाठी तब्बल  ७५ लाख रुपयांची मागणी केल्याची देखील चर्चा रंगली.

महत्वाचं म्हणजे एका मुलाखतात राम्या कृष्णन यांना भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं.. तेव्हा रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगत राम्या यांनी या विषयाला पूर्ण विराम दिला. आज राम्या त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत. (ramya krishna scenes)

खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्यानंतर राम्या यांनी १२ जून २००३ साली निर्माते कृष्णा वामसी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव रित्विक कृष्णा असं आहे. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री फक्त आणि फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या. अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रींची नावे जोडण्यात आली. पण काही अभिनेत्रींनी लग्न केलं तर, काही अभिनेत्रींनी आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेतला.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.