‘आई किंवा बाळ, दोघांपैकी एकाचा जीव…’, डिलीव्हरीआधी झाली होती ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रकृती चिंताजनक

'आई किंवा बाळ... दोघांपैकी एकाचा जीव...', डिलीव्हरी आधी डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबाला बसला धक्का, खुद्द अभिनेत्रीने सांगितला हैराण करणारा अनुभव

'आई किंवा बाळ, दोघांपैकी एकाचा जीव...', डिलीव्हरीआधी झाली होती 'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रकृती चिंताजनक
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 12:46 PM

मुंबई : ‘बालिका वधू’ मालिकेने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. अशात मालिकेतील प्रत्येक कालाकाराच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न चाहते करत असतात. मालिकेतून गहना या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री नेहा मर्दा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री नेहा मर्दा सध्या तिच्या डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अडचणींमुळे चर्चेत आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या प्रसुतीकाळात आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं आहे. डिलीव्हरी आधी डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबाला धक्का बसला होता. सध्या सर्वत्र नेहा मर्दा हिची चर्चा रंगत आहे…

नेहा मर्दा हिने तिच्या युट्यूब चॅनलवर डिलीव्हरीसंबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. नेहाने लग्नाच्या १० वर्षांनंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. नेहाने सांगितलं, तिला कायम एकच प्रश्न विचारला जोतो की, अभिनेत्री डिलीव्हरीसाठी नॉर्मल डिलीव्हरीला प्राधान्य दिलं की सी- सेक्शनला.. यावर उत्तर देत अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देत अभिनेत्रीने डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अडचणींबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘एप्रिल २०२३ मध्ये माझी प्रकृती खालावली. त्यामुळे मला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी माझ्या बीपीमध्ये अचानक चढ-उतार सुरु झाले. सुरुवातीला आम्ही फक्त नॉर्मल डिलीव्हरीचा पर्याय निवडला होता. पण, माझ्या बीपीमुळे आम्हाला नंतर सी-सेक्शन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा लागला.”

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘डिलीव्हरी दरम्यान बीपीमध्ये अचानक चढ-उतार सुरु झाल्यामुळे डॉक्टर त्रस्त झाले. अशात डॉक्टरांनी माझ्या कुटुंबाोबत चर्चा करत सर्व अडचणींबद्दल सांगितलं. डॉक्टरांनी माझ्या कुटुंबाला विचारलं, ‘आई किंवा बाळ दोघांपैकी एकाचा जीव वाचू शकतो…’ डॉक्टरांच्या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्या कुटुंबासाठी फार कठीण होतं..’

नेहा पुढे म्हणाली की, लोक अनेकदा टोमणा मारतात की त्यांनी नॉर्मलऐवजी सी-सेक्शन निवडले आहे जेणेकरून जास्त त्रास होणार नाही मिळेल, पण तसं काहीही नाही, डिलीव्हरी कोणत्याही पद्धतीत झाली तरी बाळ निरोगी असणं सर्वात जास्त आवश्यक आहे. सध्या नेहा मर्दा तिच्या डिलीव्हरीमुळे तुफान चर्चेत आहे.

नेहा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिवाय चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.