‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; कधी पाहता येईल समाधी सोहळा?

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'रमा राघव' आणि 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्या तरी बहुप्रतीक्षित 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; कधी पाहता येईल समाधी सोहळा?
'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोपImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 11:35 AM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात अन् विविध अवतारात बाळूमामांनी त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण आता ही लोकप्रिय भक्तिरसपूर्ण मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक् करणाऱ्या चरित्रातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पाहायला मिळाले. शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामांचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला.

महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठीवर काही वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजली. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं. पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवलं. त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभर प्रेम दिलं.

हे सुद्धा वाचा

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामांनी परत पाठवून समाधी घेतल्याचं पाहायला मिळेल. एकंदरीतच बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना घडला. अवघा महाराष्ट्र ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषाने दुमदुमला. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत प्रेक्षकांना समाधी सोहळा 22 ते 28 जुलैदरम्यान पहायला मिळणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर पाहता येईल.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.