मुंबई : गेल्या वर्षी अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली होती. बप्पी लहरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लहरी यांनी १९७०-८० च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक सिनेमांना लोकप्रिय गाणी दिली. अशात त्याच्या निधनानंतर चाहत्यांसह बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला. लहरी यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण आता कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा याने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
प्रसिद्ध दिवंगत गायक बप्पी लहरी यांचा मुलगा बप्पा लाहरी आणि त्यांची पत्नी तनिषा वर्मा सध्या खूप आनंदी आहेत. कारण बाप्पा आणि पत्नी तनिषा यांनी नुकताच दुसऱ्या मुलाचं मोठ्या आनंदात स्वागत केलं आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर लहरी कुटुंबात आनंदाचं वातारवण आहे. सध्या सर्वत्र लहरी कुटुंबाची चर्चा आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पा आणि तनिषाच्या दुसऱ्या मुलाचा जन्म लॉस एंजेलिसमध्ये झाला आहे. त्यांनी मुलाचं नाव शिवाय ठेवलं आहे. आई आणि मुलाच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सूत्राने सांगितलं की, ‘बाल आणि आई दोघेही ठीक आहेत. शिवाय बप्पी लहरी परत आल्याचा विश्वास यावेळी कुटुंबीयांनी व्यक्त केला.’
बप्पी दा यांच्या निधनानंतर कुटुंबात आनंदाची बातमी आली आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते.
यार बिना चैन कहा रे, याद आ रहा है तेरा प्यार, रात बाकी, बात बाकी, तम्मा तम्मा लोगे, बम्बई से आया मेरा दोस्त, ऊलाला ऊलाला (डर्टी पिक्चर), तुने मारी एंट्रिया यांसारखी असंख्य गाणी बप्पी दा यांनी बॉलिवूडसाठी गायली.. आजही चाहते बप्पी लहरी यांना विसरु शकलेले नाहीत..
बप्पी लहरी यांनी फक्त संगीत क्षेत्रात नाही तर, राजकारणात देखील पाय ठेवला होता. बप्पी लाहिरी यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार घोषित करण्यात आले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.