हृतिकसोबत अफेअरच्या चर्चा, वर्षातच घटस्फोट; अवघ्या 39 व्या वर्षी ‘आजी’; कोण आहे ही अभिनेत्री?
अशी एक अभिनेत्री जिचे नाव हृतिक रोशनसोबत जोडले गेले होते. ही अभिनेत्री अवघ्या 20 व्या वयात आई तर 39 व्या वयात आजी झाली आहे. चित्रपटापेक्षाही या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य प्रचंड चर्चेचा विषय राहिला आहे.
बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्रीबद्दल आणि अभिनेत्याबद्दल कोणती चर्चा व्हायरल होईल याबद्दल काही सांगता येत नाही. तसेच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर नेहमीच चर्चा होत असते. त्यांचे लग्न, घटस्फोट किंवा विवाहबाह्यसंबध सर्वांबद्दच चर्चा आणि अफवा या पसरतच असतात.
हृतिकसोबत अफेअरच्या चर्चा
अशाच पद्धतीची जोरदार चर्चा झालेली ती म्हणजे एका अभिनेत्रीची जिचे नाव हे हृतिक रोशनसोबत जोडले गेले होते. अभिनेता हृतिक रोशनचा 2014 साली सुझैन खानसोबत घटस्फोट झाला. मात्र घटस्फोटाआधीच हृतिक आणि कंगना रणौतच्या अफेअरच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. मात्र कंगनाशिवाय हृतिकचं आणखी एका अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं होतं. तिचीही तेवढीच चर्चा झाली होती.
बार्बरा मोरीचे गाणे आजही लोकप्रिय
‘दिल क्युं येह मेरा शोर करे’ हे गाण्याचे बोल वाचल्यावर किंवा ऐकल्यावर एक अभिनेत्री नक्कीच डोळ्यासमोर येते ती म्हणजे बार्बरा मोरी. 2010 साली आलेल्या ‘काईट्स’ सिनेमात हृतिक, बार्बरा आणि कंगना रणौत तिघेही होते. मूळ मेक्सिकन असलेल्या बार्बराने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या सौंदर्याने भारतीयांना वेड लावलं होतं.
काईट्स नंतर बार्बरा पुन्हा हिंदी सिनेमात दिसलीच नाही. हा सिनेमाही बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र सिनेमातील गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पण यानंतर बार्बराने पुन्हा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीपासून लांब राहणेच पसंत केले आहे. सध्या बार्बरा भारतापासून दूर तिचं आयुष्य जगत आहे.
View this post on Instagram
वयाच्या 39 वर्षी अभिनेत्री आजी
बार्बरा मेक्सिकन सिनेमांमध्ये काम करते. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चर्चेत असते. ती आता 46 वर्षांची आहे. पण तुम्हाला माहितीये का की तब्बल 40 वर्षांची असतानाच बार्बरा आजी झाली आहे. बार्बराचा जन्म 1978 सालचा.1996 साली सर्जिओ मेयरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 1998 साली तिला मुलगाही झाला. तेव्हा बार्बराचं वय अवघं 20 वर्ष होतं.
एका नातीची आजी
बार्बराचा मुलगा सर्जिओ मेयर मोरीला 2016 साली त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडपासून एक मुलगी झाली. त्यामुळे बार्बरा वयाच्या 39 ते 40 वर्षी ती एका नातीची आजी झाली आहे. बार्बरा आणि सर्जिओचं नातं मुलगा झाल्यानंतरच तुटलं होतं. 2016 साली बार्बराने बास्केटबॉल प्लेयर केनेथ रे सिगमन सोबत लग्न केलं. मात्र एका वर्षात 2017 मध्येच त्यांचा घटस्फोट झाला.
आता घटस्फोटानंतर वयाच्या 46 वर्षातही बार्बरा एकटीच आयुष्य जगत आहे. मेक्सिकन सिनेमांमध्ये ती काम करत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टला हृतिक रोशनचे लाईक्स आजही असतात. मात्र एका रिपोर्टनुसार बार्बरा सध्या फिल्ममेकर फर्नांडो रोवझरला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. बॉयफ्रेंडसोबत अनेकदा ती फोटो शेअर करत असते.
View this post on Instagram