टिकटॉक स्टार संतोष मुंडे याच्या मृत्यूने घरात स्मशान शांतता, कुटुंबावर दुखाचा डोंगर
संतोष मुंडे हा टिकटॉक स्टार होता. संतोषच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
बीड : कोट्यवधी लोकांच्या मनावर छाप टाकून त्यांना खळखळून हसवणाऱ्या संतोष मुंडे याचा दुर्दैव मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी करंट लागून दोघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये संतोषचा ही समावेश होता. कृष्णा मुंडे हा संतोषचा पुतण्या होता. पुतण्याला करंट लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी संतोष धावून गेला आणि तोही विद्युत प्रवाहाच्या सानिध्यात आला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. संतोष मुंडे हा टिकटॉक स्टार होता. संतोषच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. संतोष कायमच आपल्या बोलीमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता.
आता संतोष हा परत तुम्हाला कधीच हसवणार नाही…कारण सर्वांना हसवणारा हा संतोष या जगात राहिलाच नाही. महावितरणच्या डीपीने संतोष मुंडे याचा घात केला. महावितरणने खबरदारी म्हणून वेळीच डीपीला संरक्षण दिल असतं तर आज संतोष मुंडेंचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता, अशी ओरड आता ग्रामस्थ करतायत.
संपूर्ण जगाला हसवणारा संतोष काळाच्या पडद्याआड गेलाय, हे कुटुंबाला अद्यापही मान्यच नाही. ज्या घरात व्हिडिओ बनवून खळखळून हास्य व्हायचे आता त्याच घरात संतोषच्या आठवणीने स्मशान शांतता पसरली आहे. दोन वर्षाच्या मुलीला तिचा बाप या जगात नाही, याची साधी कल्पना देखील नाहीये.
संतोषचे वडील माजी सैनिक आहेत. त्यांनाही मोठा धक्का बसलाय… संतोषच्या कुटुंबाचं पुनर्वसन करा अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत…संतोष मुंडे हा टिकटॉक स्टार होता. संतोष हा प्रचंड हळवा होता. डोळ्यादेखत पुतण्या कृष्णाला विजेचा शॉक लागल्यानंतर संतोषला रहावलं नाही, संतोष तातडीने धावत त्याला सोडवण्यासाठी गेला. मात्र संतोषचा तिथेच दुर्दैवी मृत्यू झाला.
धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील गावात उघड्यावर डीपी आहे. गुरांना हाकालत असताना करंट लागला आणि दोघांचाही दुर्दैव मृत्यू झाला. संतोषच्या मृत्यूनंतर गावात अक्षरशः स्मशान शांतता पसरलीय. संतोष याला आई-वडील पत्नी आणि तीन मुले आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा जीव गेल्याचा आरोप संतोषच्या कुटुंबाने केला आहे.
संतोष मुंडे हा सामाजिक जनजागृतीचे कामही सोशल मीडियावर कायमच करत होता. मात्र महावितरणच्या अनास्थामुळे संतोष सारख्या उमद्या कलाकाराचा दुर्दैवी अंत होतो, हे मात्र मनाला चटका लावणारे आहे.