ऐश्वर्याच्या आधी या अभिनेत्रीसोबत होणार होता अभिषेक बच्चनचा विवाह, एका कीस सीनमुळे…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. दोघेही एकत्र राहत नसल्याचं देखील समोर आले आहे. आता अभिषेक बच्चनच्या जुन्या अफेअरची देखील चर्चा आहे. ऐश्वर्याच्या आधी तो बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला डेट करत होता, लग्न देखील ठरलं होतं. पण एका किसिंग सीनमुळे लग्न मोडल्याचं बोललं जातं,

ऐश्वर्याच्या आधी या अभिनेत्रीसोबत होणार होता अभिषेक बच्चनचा विवाह, एका कीस सीनमुळे...
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 8:21 PM

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन ही आता बच्चन कुटुंबियांसोबत राहत नसल्याची चर्चा आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या घटस्फोट झाल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर येत आहे. त्यामुळे आता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण अनेकांना ही गोष्ट माहित नाही की, अभिषेक बच्चनचा विवाह आधी राणी मुखर्जी सोबत होणार होता. बच्चन कुटुंबात तिच्याबद्दल सकारात्मक चर्चा होती. संपूर्ण बच्चन कुटुंब तिला पंसती देत होतं. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. ते लग्न करण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. बच्चन कुटुंबानेही त्याला मान्यता दिली होती. त्यामुळे राणी मुखर्जी बच्चन कुटुंबाची सून होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. जया बच्चन यांना राणी खूप आवडत होती. पण नंतर अचानक त्यांचे नाते तुटले. अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे बच्चन कुटुंबासोबत राणीचे नातेही बिघडले. आज देखील जया आणि राणी प्रेमळपणे भेटतात.

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्यात काही भांडण झाल्यामुळे त्यांचा विवाह तुटला होता. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 2001 मध्ये आलेल्या ‘बस इतना सा ख्वाब है’ या चित्रपटात त्यांची जोडी पहिल्यांदा दिसली होती. यानंतर त्याने ‘LOC: कारगिल’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘लक बाय चान्स’, ‘हम तुम’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. एकत्र काम करत असतानाच अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या.

अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांची जोडी चित्रपटात गाजू लागली. पण 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं. ‘ब्लॅक’मध्ये अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यात लिपलॉक सीन होता. ज्यामुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे नंतर जया बच्चन आणि अभिषेक बच्चनलाही ते आवडले नव्हते. या लिपलॉक सीनमुळे राणी मुखर्जी आणि बच्चन कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याचा दावा केला जातो.

‘आयएएनएस’शी बोलताना अभिषेक बच्चनने म्हटले होते की, आमच्यात भांडण नाही. अशा गोष्टींचा आमच्या मैत्रीवर कधीही परिणाम झाला नाही. राणी आणि मी बहुतेक चित्रपटांमध्ये पती-पत्नीच्या भूमिका केल्या आहेत. मला तिच्यासोबत आणखी चित्रपट करायचे आहेत. नंतर अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायशी लग्न केले आणि त्याने राणी मुखर्जी किंवा तिच्या कुटुंबीयांनाही आपल्या लग्नाचे आमंत्रण दिले नाही. यामुळे राणी मुखर्जीला मोठा धक्का बसला आहे. ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2007 मध्ये लग्न केले. या लग्नाला सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती, मात्र राणी मुखर्जीला निमंत्रित करण्यात आले नव्हते.

राणीने ‘फिल्मफेअर’ला सांगितले होते की, ‘याचे उत्तर फक्त अभिषेकच देऊ शकतो. सत्य हे आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या लग्नाचे आमंत्रण द्यायचे नसेल, तर त्या व्यक्तीशी तुमचे नाते काय आहे हे लक्षात येते.

राणी मुखर्जी पुढे म्हणाली, ‘तुम्ही मित्र आहात असा विचार केला. परंतु कदाचित ही मैत्री फक्त सेटवर सहकलाकार होण्यापुरती मर्यादित होती. मात्र, आता काही फरक पडत नाही. हे अगदी स्पष्ट झाले आहे की आम्ही फक्त सहकलाकार होतो, मित्र नाही. एखाद्याला लग्नासाठी आमंत्रित करणे ही वैयक्तिक निवड आहे. जेव्हा मी लग्न करेन, तेव्हा मी काही मूठभर लोकांना निवडेन ज्यांना मला आमंत्रित करायचे आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.