Pathaan: Deepika padukone च्या सेक्सी, मादक अदांनी ‘बेशर्म रंग’मध्ये भरले रंग, VIDEO
'पठाण'च पहिलं गाण रिलीज. दीपिका-शाहरुख खानचा सुपरबोल्ड अवतार
मुंबई: लवकरच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण एकत्र मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. त्यांच्या बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. आज ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाण रिलीज झालं. SRK च्या पठाण सिनेमातील हे रिलीज झालेलं पहिलं गाण आहे. हे गाण पाहताना दीपिका पदुकोणच्या अदा सर्वांच लक्ष वेधून घेतात. या गाण्यामध्ये दीपिकाने तिचा सुपरबोल्ड अंदाज दाखवला आहे. त्यामुळे हे गाणं विशेष लक्षवेधी ठरतं.
दोघांचे लूक लक्षवेधी
‘बेशर्म रंग’ हे 3 मिनिट 3 सेकंदाच गाण युरोपमधल्या सुंदर लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलं आहे. दीपिका पदुकोणसोबत शाहरुख खानचा लूकही लक्षवेधी ठरतो. त्याची मस्कुलर बॉडी फ्लॉन्ट आणि अॅप्स या गाण्यामध्ये दिसतात.
शिल्पा रावने हे गाण गायलय. या गाण्यावर तुमचे पाय नक्कीच थिरकतील. ऋतिक रोशनच्या ‘बँग-बँग’ आणि रणवीर सिंहच्या ‘बेफिक्रे’ गाण्याच्या फिलिंग बेर्शम रंग गाण्यामध्ये आहे.
युजरच्या कमेंट काय?
हे गाण रिलीज झाल्यानंतर लोकांच्या Reactions चा विचार केला, तर गाण्यापेक्षा दीपिका-शाहरुखच्या बोल्ड अदांवर जास्त कमेंट केल्यात. “एक्सप्रेशन्सच्या माध्यमातून शाहरुख आणि दीपिकाने आम्हाला बांधून ठेवलय” अशी एका युजरने कमेंट केलीय. “शिल्पा राव अंडर रेटेड सिंगर आहे, पण तिने कमालीच गायन केलय” असं दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटलं आहे.
कोणाच्या महत्त्वाच्या भूमिका?
शाहरुख खानच्या या पठाण चित्रपटाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहतायत. चित्रपटाचा टीजर आधीच रिलीज झालाय. त्यात भरपूर Action दिसून आली. ‘पठाण’मध्ये शाहरुखशिवाय जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेत.